सीबीआयचे अतिरिक्त संचालक एम. नागेश्वर राव यांची पदानवती

सीबीआयचे अतिरिक्त संचालक एम. नागेश्वर राव यांची पदानवती

सीबीआयचे अतिरिक्त संचालक एम. नागेश्वर राव यांची शुक्रवारी पदानवती करून त्यांच्याकडे अग्निशमन, नागरिक सुरक्षा व होमगार्ड खात्याच्या महासंचालकपदाची सूत्

गुजरातचे भूतपूर्व गृहमंत्री हरेन पंड्यांच्या खून प्रकरणाचा तपास सीबीआयने खरोखरच केला का?
इशरत जहाँ प्रकरणः तपास अधिकाऱ्याच्या बरखास्तीच्या निर्णयाला स्थगिती
अस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध

सीबीआयचे अतिरिक्त संचालक एम. नागेश्वर राव यांची शुक्रवारी पदानवती करून त्यांच्याकडे अग्निशमन, नागरिक सुरक्षा व होमगार्ड खात्याच्या महासंचालकपदाची सूत्रे देण्यात आली आहे. त्यांचा सेवेचा कार्यकालही कमी करण्यात आलेला आहे. पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कॅबिनेट समितीने हा निर्णय घेतला असून तो केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवला आहे.

अग्निशमन, नागरिक सुरक्षा व होमगार्ड खाते हे सीबीआयपेक्षा कमी दर्जाचे मानले जाते आणि त्या खात्याच्या महासंचालकपदाची जबाबदारी सीबीआयचे अतिरिक्त प्रमुख असणाऱ्या अधिकाऱ्याकडे देण्याचा अर्थ ती पदानवती समजली जाते. सध्याचे एम. नागेश्वर यांचे सीबीआयमधील पद त्याहून वरचे आहे.

गेल्या वर्षी सीबीआयच्या प्रमुख संचालकपदावरून वाद झाल्यानंतर सरकारने सीबीआयचे तत्कालीन संचालक आलोक वर्मा यांची उचलबांगडी करून त्यांची बदली अग्निशमन, नागरिक सुरक्षा व होमगार्ड खात्यात केली होती. पण आलोक वर्मा यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला होता व नंतर त्यांनी सेवेचा राजीनामा दिला होता.

त्यानंतर केंद्र सरकारने वर्मा यांच्या जागी नागेश्वर राव यांना सीबीआयचे हंगामी संचालक म्हणून नियुक्त केले होते. पण नागेश्वर राव यांनी कोणतेही नियुक्तीचे निर्णय घेऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. नागेश्वर राव यांनी फक्त प्रशासकीय कार्य पाहावे असे न्यायालयाने त्यांना सांगितले होते.

१ फेब्रुवारी २०१९पर्यंत नागेश्वर राव यांनी सीबीआयचे हंगामी संचालकपद  हाताळले होते. पण त्यानंतर सरकारने त्यांना सीबीआयचे अतिरिक्त संचालक म्हणून पदभार देत २ फेब्रुवारी २०१९मध्ये सीबीआयच्या संचालकपदी ऋषीकुमार शुक्ला यांची नियुक्ती केली होती. तेव्हाच सरकार व नागेश्वर राव यांच्यातील मतभेद उघड झाले होते.

गेल्या जानेवारीत नागेश्वर राव यांच्या नियुक्तीला आक्षेप घेणारी एक याचिका एका आरटीआय कार्यकर्त्याने दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली होती.

एम. नागेश्वर राव हे १९८६च्या भारतीय पोलिस सेवेतील तुकडीतील अधिकारी आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0