‘सीबीआयला काही मिळालं नाही, पण छाप्याची वेळ मजेशीर’

‘सीबीआयला काही मिळालं नाही, पण छाप्याची वेळ मजेशीर’

नवी दिल्लीः काँग्रेसचे लोकसभेतील खासदार कार्ती चिदंबरम यांनी चीनच्या २५० नागरिकांना व्हिसा दिला व त्यातून ५० लाख रु.ची लाच घेतली असा ठपका ठेवत सीबीआयन

आकार पटेल यांना परदेशात जाण्याची तूर्त मनाई
‘भाजपच्या १२१ नेत्यांची फाईल ईडीला सोपवू’
‘क्रोनोलॉजी समझीये’ : सीबीआयच्या माजी प्रमुखांवरही पाळत

नवी दिल्लीः काँग्रेसचे लोकसभेतील खासदार कार्ती चिदंबरम यांनी चीनच्या २५० नागरिकांना व्हिसा दिला व त्यातून ५० लाख रु.ची लाच घेतली असा ठपका ठेवत सीबीआयने मंगळवारी चिदंबरम यांच्या चेन्नई व दिल्ली व अन्य १० ठिकाणच्या कार्यालये व घरांवर छापे मारले. या छाप्यात सीबीआयला काहीच सापडले नाही व त्यांनी काहीच जप्त केले नाही. पण या छाप्याची वेळ मनोरंजक होती अशी खिल्ली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी उडवली.

मंगळवारी सीबीआयने कार्ती चिदंबरम यांच्या चेन्नईमधील तीन, मुंबईत तीन, कर्नाटक, पंजाब, दिल्ली व ओदिशामध्ये प्रत्येक एक ठिकाणी छापे मारले. कार्ती यांनी २०११मध्ये पंजाबमध्ये तलवंडी साबो वीज प्रकल्पाच्या निमित्ताने जुलै व ऑगस्ट २०११मध्ये चीनच्या २५० कामगारांना व्हिसा देत ५० लाख रु.हून अधिक रुपयांची लाच घेतली, असा सीबीआयचा नवा आरोप आहे.

या गुन्ह्याचे पुरावे मिळवण्यासाठी सीबीआयने छापे मारले. या छाप्यानंतर कार्ती चिदंबरम यांनीही सीबीआयच्या कारवाईची खिल्ली उडवली. माझ्या घरावर आजपर्यंत सीबीआयने किती छापे मारले याची मोजदादच करणे मी सोडले असून सीबीआयचा हा विक्रमच असावा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर कार्ती यांचे वडील पी. चिदंबरम यांनी सीबीआयच्या छाप्याची वेळ मजेशीर आहे असे टोला मारत सीबीआयची एक टीम माझ्याकडे आली. एक फिर्याद त्यांनी दाखवली. या फिर्यादीत माझे नाव नाही. पण त्यांनी मारलेल्या छाप्यात काहीच मिळाले नाही व त्यांनी काहीच जप्त केले नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: