नवी दिल्लीः गेल्या ८ वर्षांत केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये नोकरीसाठी २२ कोटी ५० हजार अर्ज आले होते, त्या पैकी ७ लाख २२ हजार उमेदवारांनाच नोकऱ्या
नवी दिल्लीः गेल्या ८ वर्षांत केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये नोकरीसाठी २२ कोटी ५० हजार अर्ज आले होते, त्या पैकी ७ लाख २२ हजार उमेदवारांनाच नोकऱ्या मिळाल्या, हा आकडा एकूण अर्जांच्या तुलनेत १ टक्क्यापेक्षा कमी असल्याचे बुधवारी केंद्र सरकारने लोकसभेत सांगितले. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार हे लक्षात येते की गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने आपल्या नोकऱ्यांमध्येही कपात केली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार २०१४-१५ ते २०२१-२२ या काळात सरकारकडे नोकऱ्यांसाठी २२.०५ कोटी अर्ज आले होते, या पैकी ७ लाख २२ हजार नोकऱ्या (०.३३ टक्के) देण्यात आल्या. २०१९-२० या काळात सर्वाधिक १ लाख ४७ हजार विविध खात्यांमध्ये भरती करण्यात आली. हे वर्ष वगळता गेल्या ८ वर्षांत केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये कपात केली जात आहे.
२०१४-१५ मध्ये १ लाख ३० हजार नियुक्त्या, २०१५-१६ मध्ये १ लाख ११ हजार, २०१६-१७ मध्ये १ लाख १ हजार, २०१७-१८मध्ये ७६,१४७, २०१८-१९ मध्ये ३८,१००, २०१९-२० मध्ये ७८,५५५ व २०२१-२२ मध्ये ३८,८५० नियुक्त्या झाल्या.
लोकसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या ८ वर्षांत ७ लाख २२ नियुक्त्या झाल्या पण गेल्या १४ जूनमध्ये केंद्र सरकारने येत्या १८ महिन्यात १० लाख नोकऱ्या उपलब्ध केल्या जातील असे आश्वासन दिले होते. ही घोषणा पंतप्रधान कार्यालयाने सर्व खाती व मंत्रालयांशी चर्चा केल्यानंतर केली होती.
नोकऱ्यांसाठी सरकारकडे येणाऱ्या अर्जाच्या संख्येतही वाढ दिसून आली आहे. गेल्या ८ वर्षांतील नोकरी आलेल्या अर्जांची सरासरी २ कोटी ७५ लाख इतकी दिसून आली. या काळात दरवर्षी सरासरी ९०,२८८ उमेदवारांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.
मूळ बातमी
COMMENTS