जीएसटीचे संकलन अंदाजापेक्षा ४०% ने कमी

जीएसटीचे संकलन अंदाजापेक्षा ४०% ने कमी

या महिन्यांकरिता जीएसटीचे संकलन ५.२६ लाख कोटी होईल असा अंदाज होता, मात्र प्रत्यक्ष संकलन ३.२८ लाख कोटी झाले असे अर्थखात्याचे राज्यमंत्री अनुराग सिंग ठ

रोख रकमेच्या अनुदानाची चलाख खेळी
विधायक राष्ट्रवादाची हाक
भारताची अर्थव्यवस्था सुस्त : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

या महिन्यांकरिता जीएसटीचे संकलन ५.२६ लाख कोटी होईल असा अंदाज होता, मात्र प्रत्यक्ष संकलन ३.२८ लाख कोटी झाले असे अर्थखात्याचे राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी सांगितले.
नवी दिल्ली: सोमवारी संसदेत सादर केलेल्या डेटानुसार २०१९-२० या आर्थिक वर्षातील एप्रिल-नोव्हेंबर या काळात वस्तू आणि सेवा कराचे संकलन अंदाजापेक्षा जवळजवळ ४०% ने कमी झाले आहे.
अंदाजपत्रकानुसार एप्रिल नोव्हेंबरमध्ये सीजीएसटी ५,२६,००० कोटी रुपये संकलनाचा अंदाज होता, मात्र प्रत्यक्ष संकलन ३,२८,३६५ कोटी रुपये झाले असे अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी लोकसभेमध्ये लिखित उत्तरात सांगितले आहे.
मात्र हा डेटा अंतिम नाही असेही मंत्र्यांनी पुढे म्हटले आहे.
२०१८-१९ मध्ये अंदाजपत्रकातील ६,०३,९०० कोटी रुपये अंदाजाच्या तुलनेत प्रत्यक्ष संकलन ४,५७,५३४ कोटी रुपये झाले.
२०१७-१८ मध्ये सीजीएसटी संकलन २,०३,२६१ कोटी होते.
मंत्र्यांनी सांगितले, यावर्षी ऑक्टोबरपर्यंत जीएसटीच्या चुकवेगिरीसाठी ९९९ प्रकरणे नोंदवण्यात आली आणि ८,३१४.३९ कोटी रुपये वसूल करण्यात आले.
२०१८-१९ मध्ये, एकूण १९,३९५.२६ कोटी रुपये वसूल करण्यात आले (१४७३ प्रकरणे) आणि २०१७-१८ मध्ये ७५७.८१ कोटी रुपये वसूल करण्यात आले (१४८ प्रकरणे).
जीएसटीच्या चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी देखरेख ठेवण्याकरिता संगणक प्रणालीतील विविध साधनांचा उपयोग करण्यात येणार असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.
“या संबंधामध्ये, सीबीआयसीद्वारे डायरेक्टोरेट जनरल ऑफ ऍनालिटिक्स अँड रिस्क मॅनेजमेंट (DGARM) स्थापित करण्यात आले आहे. त्याशिवाय, वाहतूक केल्या जाणाऱ्या मालाची अचानक तपासणी करण्यासाठी ई-वे बिल पथकेही तयार करण्यात आली आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
करदात्यांना मिळणारे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) हे इनव्हॉईस किंवा क्रेडिट नोट्सच्या संदर्भात उपलब्ध असलेल्या पात्र क्रेडिटच्या २० टक्केंपेक्षा जास्त असणार नाही अशी नवीन मर्यादा घातल्याचेही मंत्र्यांनी सांगितले. यामुळे ITC चा फायदा घेण्यात फसवणुकीची प्रकरणे कमी होतील तसेच जीएसटी संकलनात वाढ होईल असेही ठाकूर यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0