‘मोदींवर पुस्तक लिहिणारे पत्रकार माहिती आयुक्तपदी’

‘मोदींवर पुस्तक लिहिणारे पत्रकार माहिती आयुक्तपदी’

नवी दिल्लीः गेले काही महिने रिक्त असलेल्या केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तपदी सरकारने भारतीय परराष्ट्रसेवेतील माजी अधिकारी यशवर्धन कुमार सिन्हा तसेच पंतप

माजी माहिती आयुक्त शैलेश गांधी यांचे जन्म प्रमाणपत्र आहे कुठे?
सारस्वत बँकेच्या थकबाकीदारांची नावे उघड करण्यास स्थगिती
गोशाळा आणि ६२ लाखांची मर्सिडीज : गोव्याच्या राज्यपालांनी राजभवनाचे भाजपच्या धर्मशाळेत रूपांतर केले आहे

नवी दिल्लीः गेले काही महिने रिक्त असलेल्या केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तपदी सरकारने भारतीय परराष्ट्रसेवेतील माजी अधिकारी यशवर्धन कुमार सिन्हा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘Marching with a Billion,’ हे पुस्तक लिहिणारे पत्रकार उदय महुरकर यांना माहिती आयुक्त म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन नावांना काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी आक्षेप घेतला आहे. चौधरी हे मुख्य माहिती आयुक्तपदी व अन्य माहिती आयुक्त पदींच्या निवड मंडळातील एक सदस्य आहेत. मोदींची प्रशंसा करणे व भाजपचे समर्थक म्हणून महुरकर यांना ही बक्षिसी दिली अशी टीका चौधरी यांनी केली आहे.

‘इंडिया टुडे’ या वृत्तसमुहामध्ये कार्यरत असलेले उदय महुरकर यांनी माहिती आयुक्तपदासाठी अर्जही केलेला नाही तरी त्यांची निवड कशी झाली असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला आहे. गेल्या २४ ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली माहिती खात्याच्या रिक्त पदी अनेक जणांच्या नियुक्तीसंदर्भात बैठक झाली. ही बैठक औपचारिकता दाखवण्यासाठी होती पण या बैठकीत माहिती अधिकारांतर्गत अपेक्षित पारदर्शकता व जबाबदारीत्व यांना दुर्लक्ष करण्यात आल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे.

देशाच्या मुख्य माहिती आयुक्तपदासाठी अनुभव आवश्यक असून त्या उमेदवाराकडे कायदा, विज्ञान व मानवाधिकार या क्षेत्रातील अनुभव हवा आहे. पण यशवर्धन कुमार सिन्हा यांच्याकडे यातील कोणताच अनुभव नसून त्यांच्या जागी अनुभवी असलेले सध्याचे माहिती आयुक्त वनजा एन. सरना यांना नियुक्त केले जावे, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे. सरना यांची नियुक्त सर्व तरतुदी पाळून शक्य आहे, ते ज्येष्ठ आहेत, असेही चौधरी म्हणाले.

उदय महुरकर यांच्या माहिती आयुक्तपदी नियुक्तीबद्दल चौधरी यांनी आश्चर्य व्यक्त केले. माहिती आयुक्तपदासाठी ३५५ अर्ज आले होते, यात महुरकर यांचा अर्जही नसताना त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब सरकारने केले. महुरकर यांनी मोदींवर ‘शासन के मंत्र’ हे पुस्तक लिहिले असून ते खुले आम भाजपचे प्रचारक म्हणून काम करतात, असा दावा चौधरी यांनी केला.

मुख्य माहिती आयुक्तपदी १३९ अर्ज तर माहिती आयुक्तपदासाठी ३५५ अर्ज आले होते.

सध्या केंद्रीय माहिती आयोगात ५ माहिती आयुक्त असून एकूण जागा ११ आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: