व्यंगचित्रकार मंजुलच्या ट्विटर खात्यावर केंद्राचा आक्षेप

व्यंगचित्रकार मंजुलच्या ट्विटर खात्यावर केंद्राचा आक्षेप

नवी दिल्लीः राजकीय-सामाजिक घटनांवर भाष्य करणारे प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंजुल यांच्या खात्यावर ट्विटरने कारवाई करावी असे पत्र केंद्र सरकारने ट्विटरला ल

देशभरात अभूतपूर्व आंदोलन
पिगॅसस फक्त सरकारांना विकले जाते : इस्रायल राजदूत  
महाराष्ट्र, पंजाबमध्ये कर्फ्यू, राज्यात सर्व जिल्हा सीमाबंद

नवी दिल्लीः राजकीय-सामाजिक घटनांवर भाष्य करणारे प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंजुल यांच्या खात्यावर ट्विटरने कारवाई करावी असे पत्र केंद्र सरकारने ट्विटरला लिहिले आहे. मंजुल यांची राजकीय व्यंगचित्रे ट्विटरवरच्या @MANJULtoons या पेजवर प्रसिद्ध होत असतात. या पेजवर मोदी सरकारच्या धोरणांवर व सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्यांवर, प्रतिक्रियांवर अनेक व्यंगचित्रे प्रसिद्ध होत असतात. ही व्यंगचित्रे देशाच्या कायद्याचा भंग असल्याची तक्रार सरकारने ट्विटरकडे केली आहेत. ही तक्रार ट्विटरने मंजुल यांना कळवल्याचा इमेल शुक्रवारी मंजुल यांनी आपल्या ट्विटरवर प्रसिद्ध केला.

या इमेलमध्ये सरकारने मंजुल यांच्या व्यंगचित्रांवर आपण काही कारवाई करणार नाही पण ट्विटरने त्यांच्यावर कारवाई करावी अशी विनंती केल्याचे म्हटले आहे. ट्विटरने मंजुल यांना चार पर्याय सुचवले आहेत. एक सरकारच्या विनंतीला न्यायालयात आव्हान देणे, या विषयासंदर्भात सिविल सोसायटींशी संपर्क साधणे, व्यंगचित्रे हटवण्यायोग्य वाटत असतील तर ती स्वतःहून पेजवरून हटवणे, अन्य एखाद्या पर्यायाचा विचार करणे.

सरकारने मंजुल यांच्या व्यंगचित्रांवर आक्षेप घेण्यामागे एक महत्त्वाचे कारण हे आहे की, नव्या डिजिटल नियमावलींच्या माध्यमातून सरकारला डिजिटल मीडियावर आपला अंकुश आणायचा असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक होत असल्याची सरकारची एकूण भूमिका आहे.

सोशल मीडियातून सरकारवर होणार्या टीका आवरण्यासाठी आयटी खात्याने सोशल मीडिया कंपन्यांवर अनेक वेळा दबाव आणला आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनाला समर्थन करणारी सुमारे २५० खाती बंद करण्यास ट्विटरला सांगितले होते. ही अकाउंट कारवाँ मासिक, किसान एकता मोर्चा, काही पत्रकार, व्यक्तीगत स्वरुपाची व काही शेतकरी संघटनांची होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: