कोविड-१९च्या ६.५ टक्के लसी खराब

कोविड-१९च्या ६.५ टक्के लसी खराब

नवी दिल्लीः देशात कोविड-१९ लसींमधील सुमारे ६.५ टक्के लसींचा खुराक खराब झाला असून तेलंगण, आंध्र प्रदेशात ही टक्केवारी १७.६ टक्के व ११.६ टक्के आहे तर कर

स्वदेशी ‘कोवॅक्सिन’ लसीला तज्ज्ञ समितीची मंजुरी
मोदींना उशीरा सुचलेले शहाणपण
उ. प्रदेशात २० नागरिकांना दोन वेगळ्या लसी

नवी दिल्लीः देशात कोविड-१९ लसींमधील सुमारे ६.५ टक्के लसींचा खुराक खराब झाला असून तेलंगण, आंध्र प्रदेशात ही टक्केवारी १७.६ टक्के व ११.६ टक्के आहे तर कर्नाटक, जम्मू व काश्मीरमध्ये ही टक्केवारी ६.५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. लसी खराब होऊ नये म्हणून राज्य सरकारच्या आरोग्य खात्याने त्यात लक्ष घालण्याची गरज आहे. लस खराब करण्याचा कोणालाही अधिकार नाही, लसीकरण प्रत्येक नागरिकाला होणे अत्यावश्यक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

देशात आजपर्यंत ३.५१ कोटी लसी दिल्या असून त्यापैकी १.३८ टक्के लस ४५ ते ६० वयोगटात गंभीर आजार असणार्यां व ६० वर्षांवरील नागरिकांना देण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले. १५ मार्चपर्यंत जगभरात ८३.४ कोटी कोविड-१९ लसींचे वाटप झाले त्यातील ३६ टक्के एकट्या भारतात दिल्या गेल्या आहेत.

दरम्यान केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, १ ते १५ मार्च दरम्यान १६ राज्यातील ७० जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत १५० टक्क्याने वाढ झाली आहे. तर १७ राज्यातील ५५ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची टक्केवारी १०० ते १५०च्या दरम्यान आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0