मणिपूर सरकार नमले; न्यूज पोर्टलवरील नोटीस मागे

मणिपूर सरकार नमले; न्यूज पोर्टलवरील नोटीस मागे

नवी दिल्लीः डिजिटल मीडियावर अंकुश आणण्यार्या मोदी सरकारच्या नियमावलीचा पहिला बळी मणिपूरमधील बातम्या देणारे ‘द फ्रंटियर मणिपूर’ ठरत होते. पण सरकारच्या

भाजपच्या एकाच म्यानात दोन तलवारी
कारवाई काहीही करा; फायदा भाजपचाच!
भाजपकडून फेसबुकला आठवड्याला ५३लाख रुपये बहाल

नवी दिल्लीः डिजिटल मीडियावर अंकुश आणण्यार्या मोदी सरकारच्या नियमावलीचा पहिला बळी मणिपूरमधील बातम्या देणारे ‘द फ्रंटियर मणिपूर’ ठरत होते. पण सरकारच्या या निर्णयावर चोहोबाजूने टीका झाल्याने मणिपूर सरकारने या पोर्टलवरला पाठवलेली नोटीस मागे घेतली आहे.

या पोर्टलवरून सरकारवर टीका करणारा ‘खानासी नेयनासी’ हा आठवडी कार्यक्रम होत असतो, या कार्यक्रमावर मणिपूर सरकारने आक्षेप घेत कार्यकारी संपादक पाओजेल छाओबा व पोर्टलचे प्रकाशक किशोरचंद्र वांगखेम यांना प. इम्फाळ जिल्हाधिकार्यांमार्फत २ मार्चला एक नोटीस पाठवली होती. या नोटीसीत वांगखेम यांनी डिजिटल मीडियाच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका लावण्यात आला होता. ही नोटीस पाठवताना पाच पोलिस वांगखेम यांच्या कार्यालयात गेले होते. ही नोटीस मंगळवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास मागे घेत असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

वांगखेम हे गेले काही महिने मणिपूर सरकारवर टीका करत असल्याने चर्चेत आहेत. २०१८मध्ये त्यांनी मणिपूरमधील एन. बिरेन सिंग सरकावर टीका करणारा एक व्हीडिओ फेसबुकवर अपलोड केला होता. त्यानंतर वांगखेम यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करून त्यांना तीनवेळा तुरुंगात धाडण्यात आले होते. या व्हीडिओत वांगखेम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री बिरेन सिंग व

मणिपूर सरकारने आक्षेप घेत कार्यकारी संपादक पाओजेल छाओबा व पोर्टलचे प्रकाशक किशोरचंद्र वांगखेम यांना प. इम्फाळ जिल्हाधिकार्यांमार्फत १  मार्चला एक नोटीस पाठवली होती.

मणिपूर सरकारने आक्षेप घेत कार्यकारी संपादक पाओजेल छाओबा व पोर्टलचे प्रकाशक किशोरचंद्र वांगखेम यांना प. इम्फाळ जिल्हाधिकार्यांमार्फत १ मार्चला एक नोटीस पाठवली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती. या टीकेवरून वांगखेम यांच्यावर देशद्रोह, रासुका अंतर्गत आरोप दाखल करत तुरुंगात धाडण्यात आले. नंतर मात्र मणिपूर उच्च न्यायालयाने हे सर्व आरोप रद्द करून त्यांची सुटका केली होती.

पण सप्टेंबर २०२०मध्ये वांगखेम यांना पुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात भेदाभेद करत असल्याचा आरोप ठेवत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांची डिसेंबरमध्ये सुटका झाली होती.

२०१८च्या पूर्वी वांगखेम हे फ्रंटियर मणिपूर या डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मवर वृत्तनिवेदक म्हणून काम करत होते. दर आठवड्याला त्यांचा एक शो प्रसारित होत असे. या कार्यक्रमातून ते सरकारच्या धोरणांवर टीका करत असतं.

फ्रंटियर मणिपूरचे कार्यकारी संपादक पाओजेल छोबा व संपादक धीरेन सदोकपाम आणि प्रकाशक किशोरचंद्र वांगखेम. छायाचित्र किशोरचंद्र वांगखेम.

फ्रंटियर मणिपूरचे कार्यकारी संपादक पाओजेल छोबा व संपादक धीरेन सदोकपाम आणि प्रकाशक किशोरचंद्र वांगखेम. छायाचित्र किशोरचंद्र वांगखेम.

फ्रंटियर मणिपूरचे कार्यकारी संपादक पाओजेल छोबा व संपादक धीरेन सदोकपाम या दोघांवरही या अगोदर पोलिस कारवाई झाली होते. छोबा यांनी द वायरला सांगितले की, २ मार्चला सकाळी ९च्या सुमारास पाच पोलिस वांगखेम यांना नोटीस देण्यासाठी कार्यालयात आले होते.

फ्रंटियर मणिपूर हे पोर्टल मणिपूरमधील अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर अनेक वृत्ते प्रसिद्ध करत असून त्यांच्या वृत्तांमुळे अनेक माफिया टोळ्या, प्रशासन व राजकीय नेते अस्वस्थ झाले आहेत. काही दिवसांपूर्वी एक ड्रग्ज माफिया तुरुंगात सुटला होता, त्याचे मुख्यमंत्र्यांशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जाते. या माफियाच्या सुटकेवरून अनेक महिला संघटनांनी व स्थानिक संघटनांनी सरकारविरोधात आंदोलन केले होते. मणिपूर पोलिसांमधील एक अधिकारी थुनाओजाम ब्रिंदा यांनी अमली पदार्थाचा व्यापार करणार्या टोळ्यांमधील काहींना अटक केली होती, त्यांनीही मुख्यमंत्र्यांनी दिलेला शौर्य पुरस्कार नाकारला होता.

सरकारच्या नव्या डिजिटल न्यूज मीडिया धोरणात न्यूज पोर्टलवरचा मजकूर कोणतेही कारण पुढे करत हटवण्याचे अधिकार प्रशासनाला देण्यात आले आहे. यात प्रकाशकाची बाजू ऐकूनही घेण्यात येत नाही.

खानासी नेईनासी या पोर्टलवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा अनेकदा झाली आहे. या चर्चेत केवळ मणिपूरमधील नव्हे तर अन्य राज्यांतून वक्ते, विचारवंत, राजकीय समिक्षक चर्चेत आले आहेत, असे छोबा यांचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: