बीजिंग आता सर्वाधिक अब्जाधिशांचे शहर

बीजिंग आता सर्वाधिक अब्जाधिशांचे शहर

गेले ७ वर्षे अब्जाधिशांचे शहर अशी ओळख असलेल्या न्यू यॉर्क शहराचा मान चीनची राजधानी बीजिंगने पटकावला आहे. २०२०मध्ये बीजिंगमध्ये ३३ अब्जाधीश वाढल्याने त

अरुणाचलमध्ये चीनची घुसखोरी; दुसरी वस्ती बांधली
गलवान खोरे : चीनचा दावा भारताने फेटाळला
‘यिन्तु शांग पाओ’ अखेर बंद पडले !

गेले ७ वर्षे अब्जाधिशांचे शहर अशी ओळख असलेल्या न्यू यॉर्क शहराचा मान चीनची राजधानी बीजिंगने पटकावला आहे. २०२०मध्ये बीजिंगमध्ये ३३ अब्जाधीश वाढल्याने त्यांनी न्यू यॉर्कला मागे टाकले आहे. न्यू यॉर्कमध्ये अब्जाधिशांची संख्या ९९ होती. आता फोर्ब्जच्या २०२१च्या अब्जाधिशांच्या नव्या यादीत बीजिंगमध्ये १०० अब्जाधिशांची नोंद झाली आहे. केवळ एक अब्जाधीश वाढल्याने बीजिंगने न्यू यॉर्क मागे टाकले आहे.

बीजिंगमधील व्यावसायिक झँग यिमिंग यांची संपत्ती ३५.६ अब्ज डॉलर इतकी असून न्यू यॉर्कचे रहिवासी असलेले व्यावसायिक मायकेल ब्लूमबर्ग यांची संपत्ती ५९ अब्ज डॉलर इतकी आहे.

चीनने फोर्ब्जच्या यादीत अन्य बाबतीतही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यादीत बीजिंगव्यतिरिक्त चीनमधील शांघाय, शेनझेन, हांगझू ही नवी शहरे सामील झाली आहेत. या शहरात अब्जाधिशांची संख्या वाढली आहे.

चीनचा प्रशासकीय भाग असलेल्या हाँगकाँगमध्ये ८० अब्जाधीश असून हे शहर अब्जाधिशांच्या यादीत तिसर्या क्रमांकावर आले आहे. तर भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अब्जाधिशांची संख्या ४८ इतकी दिसून आली आहे.

एका आकड्याने सर्वाधिक अब्जाधिशांचे शहर असलेल्या न्यू यॉर्कचा मान बीजिंगने हिसकावून घेतला असला तरी न्यू यॉर्कची एकूण संपत्ती बीजिंगपेक्षा अधिक आहे. न्यू यॉर्कची संपत्ती ५६०.५ अब्ज डॉलर तर बीजिंगची संपत्ती ४८४.३ अब्ज डॉलर इतकी मोजण्यात आली आहे.

फोर्ब्जच्या अब्जाधिशांच्या यादीत जगातून २,७५५ व्यक्तींची नोंद झाली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0