दुसऱ्या लाटेने ‘कोवॅक्स’चा पुरवठा मंदावला

दुसऱ्या लाटेने ‘कोवॅक्स’चा पुरवठा मंदावला

कोविड-19चा मुकाबला जगाने एकाच वेळी करावा यासाठी ‘कोवॅक्स’ योजना गेल्या फेब्रुवारीच्या अखेरीस राबवण्यात सुरूवात झाली होती. त्यानुसार 32 कोटी कोविड-19च्या लसी पाठवण्यात आल्या होत्या. पण आता कोविड लसीच्या पुरवठ्यावर परिणाम होताना दिसून येत आहे.

विंबल्डनविना जुलै महिना
कोरोना आजारातून बरे होणार म्हणजे काय?
कोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले

कोविड-19चा मुकाबला जगाने एकाच वेळी करावा यासाठी ‘कोवॅक्स’ योजना गेल्या फेब्रुवारीच्या अखेरीस राबवण्यात सुरूवात झाली होती. त्यानुसार 32 कोटी कोविड-19च्या लसी पाठवण्यात आल्या होत्या. पण आता कोविड लसीच्या पुरवठ्यावर परिणाम होताना दिसून येत आहे.

भारताने अस्ट्राझेन्काची लस कोवॅक्स अंतर्गत निर्यात करण्याचे ठरवले होते. पण गेल्या काही दिवसांत भारताकडून निर्यात होणार्या कोविड लसीचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे भारताने कोविडची दुसरी लाट पाहून आपल्या देशातील नागरिकांना कोविड लस देण्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्याच बरोबर कोविड-19चा विषाणूमध्ये बदल होत चालल्याने आणि जगभरात काही देशांमध्ये कोविडची दुसरी लाट आल्याने लशीच्या निर्यातीवर परिणाम होताना दिसत आहे.

कोवॅक्स योजनेनुसार मे अखेर द. कोरिया व भारताकडून 18 कोटी 80 लाख कोविड लसीचा खुराक जगाला मिळणार होता. पण खाली दिलेल्या तक्त्यानुसार 24 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान भारताकडून कोविड लसीचा जगाला होणारा पुरवठा द. कोरियाच्या तुलनेत अधिक होता पण नंतर तो मंदावत गेला आहे.

गेल्या महिन्याभरात कोविड लसीचा सर्वाधिक फायदा झालेल्या 10 देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकाचा देश नायजेरिया आहे. 2 मार्चला नायजेरिला 30 लाख 90 हजार लसींचा खुराक पाठवण्यात आला होता. हा आकडा नायजेरिला मिळणार्या एकूण खुराकांपैकी सुमारे 30 टक्के इतका आहे. नायजेरियाला मे अखेर सर्व लसी मिळणार होत्या. त्यानंतर इथिओपिया व काँगो या देशांना कोविड लसींची सर्वाधिक निर्यात झाली आहे.

या देशांची तुलना करता इंडोनेशिया, ब्राझील, फिलिपाइन्स यांना आजपर्यंत केवळ 9 ते 11 टक्क्यांपर्यंत लसी मिळाल्या आहेत. इंडोनेशियाला आजपर्यंत 3 कोटी 80 लाख (100 पैकी 14 जणांना लस) लसी चीनकडून मिळाल्या आहेत. तर ब्राझीलला 2 कोटी (100 पैकी 9.5 जणांना लस) लसी चीनच्या सीनोव्हॅक कंपनीकडून मिळाल्या आहेत. फिलिपाइन्सला मार्च अखेर चीनकडून 20 लाख (100 पैकी 1.8 जणांना लस) लसी मिळणार आहेत.

कोवॅक्स योजनेचा काही देशांना अजूनही फायदा झालेला नाही. त्यामध्ये बांगलादेश व मेक्सिको या देशांचा समावेश आहे. इजिप्त व पाकिस्तानने काही देशांकडून लस विकत घेतली आहे.

भारत हा लस उत्पादनातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. पण भारताला युनिसेफकडून 1 कोटी लसींचा खुराक मिळणार आहे. त्यामुळे भारत हा सर्वाधिक लस घेणारा देश होणार आहे.

कोवॅक्स योजनेचे निकष आहेत, त्यानुसार कोणत्याही देशाला त्याच्या एकूण लोकसंख्येच्या 20 टक्के लोकसंख्येला लस मिळणार आहे. तसे जे देश लस निर्यात करणार आहेत त्यांनाही लस कोवॅक्स अंतर्गत मिळणार आहेत. जे देश कोवॅक्सचे लाभार्थी आहेत, त्यांना अन्य देशांकडून लस खरेदीही करता येणार आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: