राणे कार्ड खेळून शिवसेनेला चेकमेट 

राणे कार्ड खेळून शिवसेनेला चेकमेट 

राज्यातील शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि मराठा आरक्षण या त्रि सूत्राला अधोरेखित करून भाजपने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी

कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपची सरशी
सत्ता व संपत्तीच्या हव्यासातून बंडखोरीचे राजकारण
ड्रग्ज पार्टी : एनसीबीच्या धाडीत भाजपचा कार्यकर्ता

राज्यातील शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि मराठा आरक्षण या त्रि सूत्राला अधोरेखित करून भाजपने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे हे कार्ड खेळले आहे. शिवसेना सोडल्यापासून राणे आणि शिवसेना यांच्या मधून विस्तवही जात नाही. विशेषता त्यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर असणारा विशेष राग हा भविष्यात अंगार बनून शिवसेनेची मुंबई महापालिकेतील एकहाती आणि निरंकुश सत्ता स्वाहा करण्यासाठी मोदी आणि अमित शहा यांनी या धगधगत्या अंगारात केंद्रीय मंत्री पदाचे तेल राणे यांच्यावर टाकून अंगार कसा भडकेल यासाठी खेळी केली आहे. अतिशय आक्रमक नेता अशी नारायण राणे यांची ओळख असल्याने शिवसेनेच्या आक्रमकतेला ते आणखी उत्तर देऊ शकतील अशीही एक खेळी यामागे असण्याची शक्यता आहे.  त्यांच्या आक्रमक स्वभावाचा भाजपला फायदा होणार आहे. यामुळे राज्यात शिवसेनेला धक्का बसणार अशीही सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकस आघाडी आणि भाजप असा संघर्ष पाहायला मिळत आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत या मुद्द्याचे मोठे भांडवल होणार आहे. नारायण राणे यांनीही अनेकवेळा मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारला टार्गेट केले आहे. यावरून राणेंनी फक्त महाविकस आघाडीच नाहीतर छत्रपती संभाजींनाही लक्ष्य केले होते. यामुळे याचा फायदा घेत राणे यांच्या माध्यमातून मराठा तरुणांना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो अशी चर्चा जोर धरत आहे.  मुळचे कट्टर शिवसैनिक असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने नारायण राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या उपस्थितीतच त्यांनी शिवसेना सोडली, हे महाराष्ट्रात सर्वज्ञात आहे.  त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी कधीही जमले नाही.  शिवसेना सोडण्यामागचं मुख्य कारण होतं. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राणे यांनी आपल्या प्रत्येक भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर आणि शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. त्यामुळे आता केंद्रातून ताकद लावून शिवसेनेला घेरण्यात आणखी बळ मिळेल अशी राजकीय चर्चा आहे.

एक कुशल मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सहा महीने कारभार पहिला होता. प्रशासकिय अभ्यास आणि निर्णय घेण्याची क्षमता ही त्यांची खास वेशिष्ट्ये आहेत. काँग्रेसमध्ये असताना नारायण राणे यांनी महसूलमंत्रीपदाचा कार्यभार पाहिला. काँग्रेसमध्ये कॅबिनेट मंत्री असताना अनेक वेळा त्यांनी मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी हट्ट धरला होता. पण तिथे त्यांना साथ न मिळाल्याने त्यानी  काँग्रेसला रामराम ठोकला. काँग्रेसशी काडीमोड करताच त्यांनी भाजपशी मैत्री केली.

नारायण राणे यांनी राजकारण अनेकवेळा आपली आक्रमक भूमिका मांडली आहे. मंत्री आणि मुख्यमंत्री पदाचा अनुभव असल्यामुळे प्रशासन सांभाळण्यास ते सक्षम आहेत. एकीकडे राणेंचा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याशी असलेला वाद हा सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे राणेंच्या केंद्रातील पदामुळे कुठेतरी भाजपला याचा फायदा होणार आहे. तर दुसरीकडे कोकणात शिवसेनेचा बोलबाला आहे. त्यामुळे तिथे राणेंचा आवाज भाजपसाठी फायद्याचा ठरेल. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये याचा शिवसेनेला धक्का बसतो का? हे पाहणे गरजेचे आहे. नितीन गडकरी वगळता राज्यात कुणाचाही मोठा जनाधार नाही. यामध्ये राणेंचा विचार केला तर त्यांना माणणारा मोठा वर्ग कोकणात आणि मुंबईत आहे. त्यामुळे याचाही फायदा भाजपला होणार आहे.
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगर पालिका ओळखली जाते. पुढच्या वर्षी पालिका निवडणुका आहेत.  मुंबई पालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. यावेळी पालिकेतून शिवसेनेला उखडून काढू असा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे नारायण राणे यांना मंत्री केले तर ते भाजपसाठी फायदेशीर ठरू शकते असा अंदाज या निमित्ताने व्यक्त होत आहे.

अतुल माने ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: