लिथियम बॅटरीसाठी तिघांना रसायनशास्त्राचे नोबेल

लिथियम बॅटरीसाठी तिघांना रसायनशास्त्राचे नोबेल

स्टॉकहोम : २०१९चा रसायन शास्त्र शाखेतील प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे शास्त्रज्ञ जॉन गुडेनफ, ब्रिटनचे एम स्टॅनले व्हिटींगम व जपानचे अकिरा योशिन

सिद्धार्थ वरदराजन यांना ‘डीडब्ल्यू फ्रीडम ऑफ स्पीच’ पुरस्कार
देशात महाराष्ट्राचा स्वच्छ सर्वेक्षणामध्ये दुसरा क्रमांक
मुक्त आवाज

स्टॉकहोम : २०१९चा रसायन शास्त्र शाखेतील प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे शास्त्रज्ञ जॉन गुडेनफ, ब्रिटनचे एम स्टॅनले व्हिटींगम व जपानचे अकिरा योशिनो या तीन शास्त्रज्ञांना लिथियम बॅटरीच्या संशोधनाविषयी देण्यात आला. गुडेनफ हे ९७ वर्षाचे असून नोबेल पुरस्कार मिळवणारे ते सर्वात वयोवृद्ध शास्त्रज्ञ ठरले आहेत.

लिथिमय बॅटरीच्या संशोधनामुळे ऊर्जेची साठवण करता येऊ लागली. त्यामुळे इलेक्ट्रिक कार व अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये या बॅटऱ्यांचा वापर करता येऊ लागला. हे संशोधनच अद्वितीय असल्याचा गौरव ‘द रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्स’ने नोबेल पुरस्कार जाहीर करताना आपल्या प्रसिद्धी पत्रकात केला आहे.

आपल्या हातातला मोबाइल फोन – लॅपटॉप ते विजेवर चालणारी वाहने यांमध्ये लिथिमय बॅटरी वापरण्यात येते. या बॅटऱ्या वजनाने हलक्या, आकाराने छोट्या, हाताळण्यास सुरक्षित व पुन्हा वापरण्याजोग्या असल्याने त्यांनी आधुनिक माहिती व दळणवळण तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल घडवले आहेत. या तीन शास्त्रज्ञांच्या लिथियम बॅटरीवरील अथक संशोधनाने वायरलेस व नैसर्गिक इंधनापासून मुक्त समाज तयार झाला. त्याने मानवी जीवनात क्रांतीकारक बदल घडून आलेले आहे,  असेही गौरवोद्गार नोबेल पुरस्कार समितीने काढले आहेत.

१९७० मध्ये जगाला इंधनाची समस्या भेडसावत असताना ब्रिटनचे रसायन शास्त्रज्ञ एम स्टॅनले व्हिटींगम यांनी लिथियम बॅटरी हा जैविक इंधनाला पर्याय होऊ शकतो यावर आपले लक्ष केंद्रीत केले. १९८०च्या सुमारास गुडेनफ यांनी कोबाल्ट ऑक्साइड हा चांगला कॅथोड होऊ शकतो असे सिद्ध केले. त्याच सुमारास योशिनो यांनी पेट्रोलियम कोकमधील अनेक स्तरांमधील असलेले कार्बनचे अणू हे लिथियम आयन बॅटरीमध्ये अनोड म्हणून काम करू शकतात हे सिद्ध करून दाखवले. त्यामुळे बॅटरी रिचार्ज करणे शक्य झाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0