छत्तीसगडः शेणखरेदी निर्णयावर संघ खूश, भाजप नाखूष

छत्तीसगडः शेणखरेदी निर्णयावर संघ खूश, भाजप नाखूष

नवी दिल्लीः शेतकर्यांकडून शेण खरेदी करण्याच्या छत्तीसगडमधील भूपेश बघेल सरकारच्या निर्णयाचे कौतुक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केले जात असताना प्रमुख व

देशी गायींची ‘काऊ पॅथी’ विकसित करण्यासाठी प्रस्ताव मागवले
सांस्कृतिक विकृतीकरणाची नवी रुपे!
गुजरात : गोशाळेत कोविड सेंटर; गोमूत्राचा उपचार

नवी दिल्लीः शेतकर्यांकडून शेण खरेदी करण्याच्या छत्तीसगडमधील भूपेश बघेल सरकारच्या निर्णयाचे कौतुक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केले जात असताना प्रमुख विरोधी पक्ष भाजपने मात्र मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

२१ जून रोजी राज्य सरकारने गोधन न्याय योजनेअंतर्गत दीड रुपये प्रती किलो दराने शेण खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या शेणखरेदीच्या माध्यमातून सेंद्रीय खते तयार करून ते शेतकर्यांसाठी पुन्हा विक्रीस ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

सरकारच्या या निर्णयावर टीका करताना भाजपने असे म्हटले आहे की, तरुण बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्याऐवजी सरकार तरुणांना शेण गोळा करण्यास सांगत आहे. भाजपचे माजी मंत्री अजय चंद्रकार यांनी या शेण खरेदीची खिल्ली उडवणारा एक व्हीडिओही ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे.

मंगळवारी मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांतिक समन्वयक बिसराराम यादव व अन्य संघ स्वयंसेवकांच्या स्वाक्षर्या असलेले पत्र मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना पाठवण्यात आले. या पत्रात या शेणखरेदीचे कौतुक करण्याबरोबर बघेल हे राज्यातले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचेही नमूद करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

साहू या संघ स्वयंसेवकाने पीटीआयला सांगितले की, राज्य सरकारने गोमूत्रही विकत घ्यावे, आणि शेण व गोमूत्रापासून खत तयार करण्याचे काम उद्योगांना द्यावे. त्याचबरोबर शेतकर्यांना सेंद्रीय खते तयार करण्यासाठी प्रशिक्षण द्यावे, त्यांना आर्थिक मदत करावी. गुरांसाठी छावण्या बांधाव्यात.

संघाचे एक सदस्य व ‘गौ-ग्राम स्वावलंबन’चे प्रांत प्रमुख सुबोध राठी यांनीही सरकारने आमची मागणी मान्य केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले आहे. या योजनेला भाजपचा विरोध असेल तर तो त्यांचा निर्णय असेल. पण ग्रामीण अर्थव्यवस्थेतील शेतकरी, गुरांची काळजी घेणारा व ज्याच्याकडे अशी गुरे असलेला संत वर्ग आहे हा आपला समाज आहे, असे राठी म्हणाले.

दरम्यान संघाच्या या भूमिकेबाबत भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांना विचारले असता त्यांनी, संघाच्या अनेक संस्था कार्यरत आहेत. अशातल्या एखाद्याने स्वतःचे वैयक्तिक मत व्यक्त केले असेल तर ते संघाचे मत म्हणून घेऊ नये, असे स्पष्ट केले.

संघाचे एक नेते प्रभात मिश्रा यांनी हे पत्र संघाचे म्हणून मानू नये असे स्पष्ट करत अशा निर्णयाने ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होत असेल तर ती संघाची वैचारिक भूमिकेशी सुसंगत आहे, असे दावा केला.

काँग्रेसची संघावर टीका

दरम्यान संघाने काँग्रेसच्या निर्णयाचे कौतुक केले असले तरी काँग्रेसने मात्र संघाच्या कौतुकमिश्रित प्रतिक्रियेबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. संघ आमच्या योजनेचे यश हिरावून घेत असल्याचा आरोप करत बघेल यांनी या योजनेला समाजातल्या सर्व थरातून पाठिंबा मिळत असल्याने संघ आपलीच योजना सरकारने घेतली असा प्रचार करत असल्याची टीका केली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: