गलवानमध्ये ५ जवान ठार झाल्याची चीनची कबुली

गलवानमध्ये ५ जवान ठार झाल्याची चीनची कबुली

नवी दिल्लीः गेल्या वर्षी लडाखमधील गलवान खोर्यात भारतीय सैनिकांशी झालेल्या चकमकीत आपले ५ जवान ठार झाल्याची कबुली अखेर चीनने शुक्रवारी दिली. चीनच्या लष्

नेहरूंचा निर्णय चुकला होता?
चिनी विकासाचे तैवान मॉडेल
लोकदबावापुढे हाँगकाँगचे वादग्रस्त विधेयक मागे

नवी दिल्लीः गेल्या वर्षी लडाखमधील गलवान खोर्यात भारतीय सैनिकांशी झालेल्या चकमकीत आपले ५ जवान ठार झाल्याची कबुली अखेर चीनने शुक्रवारी दिली. चीनच्या लष्कराच्या ‘पीएलए डेली’ या वृत्तपत्राने चीनच्या सेंट्रल मिलिट्री कमिशन ऑफ चायना यांच्या हवाल्याने चीनचे ५ सैनिक ठार झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. हे ५ सैनिक चीनच्या शिनजियांग लष्करी विभागातील होते.

गेल्या वर्षी १५ जूनमध्ये गलवान खोर्यातील पँगाँग सरोवराच्या भागात भारत व चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. दोन्हीकडून शेकडो सैनिक जमा झाले होते. त्याचबरोबर दोन्ही बाजूंनी युद्ध सामग्री तैनात करण्यात आली होती. या वेळी झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. पण या चकमकीत चीनने आपल्या सैन्याची झालेली हानी जाहीर केलेली नव्हती. चीनने आपले सैनिक जखमी झाले असल्याचे म्हटले होते पण त्यांचा आकडा निश्चित सांगितला गेला नव्हता. भारताने मात्र लगेचच अधिकृत सरकारी व लष्करी पातळीवर आपले २० सैनिक शहीद झाल्याचे सांगितले होते.

गेल्या १० फेब्रुवारीला रशियाच्या अधिकृत सरकारी वृत्तसंस्था ‘तास’ने चीनचे ४५ सैनिक ठार झाल्याचा दावा केला होता. तर अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात चीनचे ३५ सैनिक मारले गेल्याचे म्हटले होते. तर भारताच्या लष्करातील उत्तर कमांडचे लेफ्ट. जनरल वाय के जोशी यांनी चीनचे ४५ सैनिक ठार झाल्याचे म्हटले होते.

‘न्यूज 18’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जोशी यांनी गलवान खोर्यात प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारतीय सैन्य टेहाळणी करत होते, त्या दरम्यान चकमक झाली. या चकमकीत चीनचे अनेक सैनिक जखमी झालेले दिसून आले. आम्ही किमान ६० सैनिकांना स्ट्रेचरवरून नेताना पाहिले होते. पण हा आकडा नेमका किती होता हे सांगता येणार नाही. पण रशियाच्या ‘तास’ वृत्तसंस्थेने चीनचे ४५ सैनिक ठार झाल्याचे म्हटले होते. या आकड्याशी आपण सहमत आहे, असे जोशी म्हणाले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: