लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर चीनचे सैन्य : संरक्षणमंत्र्यांची कबुली

लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर चीनचे सैन्य : संरक्षणमंत्र्यांची कबुली

नवी दिल्लीः लडाखच्या पूर्वेकडील गलवान खोरे व पँगाँग त्सो क्षेत्रात चीनचे मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात झाले होते, त्यामुळे चिघळलेली परिस्थिती शांत करण्

भारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प
नेपाळच्या दोन्ही सभागृहांची वादग्रस्त नकाशाला मंजुरी
वादग्रस्त नकाशा नेपाळच्या कनिष्ठ सभागृहात संमत

नवी दिल्लीः लडाखच्या पूर्वेकडील गलवान खोरे व पँगाँग त्सो क्षेत्रात चीनचे मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात झाले होते, त्यामुळे चिघळलेली परिस्थिती शांत करण्यासाठी भारतानेही आवश्यक असे सर्व प्रयत्न केल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिली. गेला महिनाभर लडाखमध्ये भारताच्या ताब्यातील काही भागावर चीनच्या सैन्य जमवाजमवीवरून तणाव वाढला होता, त्यावर मोदी सरकारमधील महत्त्वाच्या मंत्र्यांचे मौन बाळगल्याने विरोधी पक्ष काँग्रेसने सरकारला प्रश्न विचारण्यास सुरूवात केली होती. आता राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्याने लडाखच्या पूर्वेला चीनचे सैन्य घुसले होते यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

विरोधकांच्या दबावामुळे बुधवारी या विषयावरचे मौन सोडताना राजनाथ सिंह यांनी येत्या ६जून रोजी भारत व चीनदरम्यान वरिष्ठ लष्करी अधिकार्यांची एक बैठक होणार असून या बैठकीत भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे सांगितले. राजनाथ सिंह म्हणाले, भारताच्या ताब्यात असलेल्या भूभागावर चीनच्या सैन्याने मोठ्या प्रमाणावर सैन्य आणून तैनात केले होते आणि त्यावर आपला हक्क सांगण्यात सुरूवात केली. त्याला भारताने आक्षेप घेतला. हा भूभाग भारताच्या हद्दीत येतो व त्यावर कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असा पवित्रा भारताने घेतला असे त्यांनी सांगितले.

अनेक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार गेल्या महिन्यात भारताच्या ताब्यातील व भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील लडाखच्या पूर्वेकडील गलवान खोरे व पँगाँग त्सो क्षेत्रात चीनचे सैन्य तैनात झाले होते. चीनच्या या कृतीवरून भारताने तीव्र आक्षेप घेतला होता व हा वाद राजनैतिक मार्गाने सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

दोन वर्षांपूर्वी भारत व चीनने डोकलाम वाद हा दोन्ही देशातल्या वरिष्ठ लष्करी अधिकार्यांनी केलेल्या वाटाघाटीतून सोडवला होता. आता तशाच वाटाघाटी करण्याबाबत भारत व चीनमध्ये सहमती झाली आहे. त्यानुसार सहा जूनला उभय देशांतील वरिष्ठ लष्करी अधिकार्यांमध्ये चर्चा होणार आहे.

मोदी-ट्रम्प फोनवर संवाद

एका कृष्णवर्णीय नागरिकाचा पोलिस मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत पेटलेल्या हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बुधवारी दूरध्वनी केला होता. पण या दूरध्वनी संभाषणात भारत-चीन तणावावरून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त आहे. या संदर्भात मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये भारत-चीन सीमावादावर बोलणे झाले असे प्रामुख्याने म्हटले नसले तरी परराष्ट्र खात्याने ट्रम्प यांच्याशी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असून दोन्ही नेत्यांनी आपापल्या देशातील कोविड -१९ परिस्थिती, चीन-भारत सीमावाद व जागतिक आरोग्य संघटनेच्या पुनर्रचनेबाबत चर्चा केली असे प्रसिद्ध पत्रकार जारी केले आहे.

काही दिवसांपूर्वी भारत-चीन वादात आपण मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे विधान ट्रम्प यांनी केले होते, त्यानंतरचा मोदींना केलेला हा पहिला दूरध्वनी आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0