चीनचे यान चंद्रावर उतरले

चीनचे यान चंद्रावर उतरले

बीजिंगः चंद्राच्या पृष्ठभागावर चीनचे ‘चंग व्हे-५’ (Chang’e-5) यान मंगळवारी यशस्वीरित्या उतरले. २४ नोव्हेंबरला ‘चंग व्हे-५’ यान चंद्राच्या दिशेने पाठवल

बीबीसी वर्ल्ड न्यूजवर चीनमध्ये बंदी
लोकदबावापुढे हाँगकाँगचे वादग्रस्त विधेयक मागे
चीनकडून १० भारतीय सैनिकांची सुटका

बीजिंगः चंद्राच्या पृष्ठभागावर चीनचे ‘चंग व्हे-५’ (Chang’e-5) यान मंगळवारी यशस्वीरित्या उतरले. २४ नोव्हेंबरला ‘चंग व्हे-५’ यान चंद्राच्या दिशेने पाठवले होते.

चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी चीनने ही मोहीम आखली आहे. चीनच्या पुराण कथांमध्ये चंद्र ही देवता मानली जात असून तिला ‘चंग व्हे’ म्हणतात.

या चंद्रमोहिमेत हे यान चंद्रावरच्या ‘ओशनस प्रोसेलॅरम’ या लाव्हा पठारावरील २ किलो ग्रॅम वजनाचे अवशेष गोळा करणार आहे. ही मोहीम यशस्वी ठरल्यास चंद्रावरचे अवशेष गोळा करणार्या अमेरिका व सोव्हिएट युनियननंतरचा चीन हा तिसरा देश ठरेल.

‘चंग व्हे-५’मधील एक रोबो चंद्राच्या पृष्ठभागाचे खोदकाम करेल. या खोदकामातून मिळालेली माती व खडकांचे अवशेष गोळा केले जातील. हे सर्व अवशेष एका कॅप्सुलमध्ये ठेवून ही कॅप्सूल चीनच्या अंतर्गत मंगोलियात उतरणार आहे.

या अगोदर २०१९मध्ये चीनने ‘चंग व्हे-४’ हे यान चंद्राच्या भागात उतरवलेले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0