सरसंघचालकांनी मान्य केली चीनची घुसखोरी

सरसंघचालकांनी मान्य केली चीनची घुसखोरी

नागपूरः चीनने आपल्या विस्तारवादी धोरणातून भारताच्या हद्दीत घुसखोरी केली पण भारतीय सैनिकांनी त्यांना चोख उत्तर दिल्याने त्यांचे सैनिक घाबरले, असे विधान

स्वातंत्र्याची विरूप व्याख्या
मोदींचे मौन सुटले; राहुल गांधीचे ५ प्रश्न
अरुणाचलमध्ये चीनने गांव वसवले

नागपूरः चीनने आपल्या विस्तारवादी धोरणातून भारताच्या हद्दीत घुसखोरी केली पण भारतीय सैनिकांनी त्यांना चोख उत्तर दिल्याने त्यांचे सैनिक घाबरले, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी दसर्या मेळाव्यात केले. आपल्या भाषणात भागवत यांनी चीनची घुसखोरी झाल्याचे मान्य केले पण खुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनची घुसखोरी झाली नसल्याचे विधान केले होते.

दरम्यान भागवत यांच्या विधानाचा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी समाचार घेतला. भागवतांनी चीनने घुसखोरी केल्याचे मान्य केले. त्यांना खरे काय घडलेय ते सत्य माहिती आहे पण या सत्याचा सामना करताना त्यांना भीती वाटतेय. सत्य हे आहे की, चीनने आपली जमीन बळकावली आहे व त्याला भारत सरकार व आरएसएसने परवानगी दिली आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भागवत व सरकारवर टीका केली.

आपल्या भाषणात भागवत यांनी संपूर्ण जग चीनच्या कुटील प्रयत्नांकडे पाहात आला आहे, जगाला चीनच्या विस्तारवादी भूमिकेचा अनुभव आला आहे, चीन एकाचवेळी तैवान, व्हिएटनाम, अमेरिका, जपान व भारताविरोधात लढत असल्याचे सांगितले. पण लडाखमध्ये चीनने घुसखोरी केल्यानंतर भारतीय सैनिकांनी अतूट देशभक्ती, शौर्य दाखवले. जनतेने दुर्दैम्य इच्छाशक्ती दाखवली व याचा अनुभव चीनला मिळाला, असे भागवत म्हणाले.

सीएएविरोधकांवर टीका

भागवत यांनी सीएए कायद्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला. या कायद्याचा विरोध करणार्यांवर त्यांनी टीका केली. या कायद्याला विरोध करून देशभरात दंगे भडकवले जात आहेत, पण सत्तेत बसलेल्यांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. कोरोना महासाथीत हा विषयच बाजूला पडला, असे ते म्हणाले.

हिंदुत्वावर भागवत म्हणाले, या शब्दांचा संबंध पूजेशी जोडला जातो पण तो अर्थच संकुचित आहे. संघ अशा संकुचित अर्थाने हिंदुत्वाकडे पाहात नाही. हा शब्द देशाची ओळख आहे. भारताचे अध्यात्म व परंपरा यांना अभिव्यक्ती देणारा तो शब्द आहे. हिंदुत्व हे देशातल्या १३० कोटी जनतेला लागू होते. तो भारतीय संस्कृती व वैश्विक मूल्यांना आचरणात आणणारा शब्द आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: