हद्दीत शिरलेल्या चिनी सैनिकाची सुटका

हद्दीत शिरलेल्या चिनी सैनिकाची सुटका

नवी दिल्लीः लडाखच्या पूर्वेकडील डेमचोक सेक्टरमध्ये ताब्यात घेतलेल्या एका चिनी सैनिकाची मंगळवारी रात्री सुटका करण्यात आली. सोमवारी कॉर्पोरल वँग या लाँग

‘भारत-चीन तणावाबाबत १७ प्रश्नांना फेटाळले’
Tik Tok सह ५९ चिनी ऍप्सवर बंदी
एनएसजी गटात चीनची पुन्हा अडवणूक

नवी दिल्लीः लडाखच्या पूर्वेकडील डेमचोक सेक्टरमध्ये ताब्यात घेतलेल्या एका चिनी सैनिकाची मंगळवारी रात्री सुटका करण्यात आली. सोमवारी कॉर्पोरल वँग या लाँग याला भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याबद्दल भारतीय लष्कराने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची चौकशीही करण्यात आली होती.

अखेर मंगळवारी रात्री त्याला चुशूल-मोल्दो येथे भारत-चीन सीमारेषेवर चीनकडे सोपवण्यात आले. वँग लाँग हा चुकून भारतीय हद्दीत घुसला असे सांगण्यात आले. वँग एका स्थानिक पशुपालकाचा याक हरवल्याने तो शोधण्याचा रस्ता दाखवत असताना भारतीय हद्दीत घुसला होता.

सध्या लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर दोन्ही देशांचे ५० हजाराहून अधिक सैन्य तैनात असून त्या तणावात ही घटना घडल्याने पुन्हा संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.

पण चीनच्या लष्कराने भारतीय अधिकार्यांशी संपर्क साधून वँग लाँग हा भारतीय हद्दीत चुकून घुसल्याचे पटवून दिले. त्यानंतर उभय देशांमध्ये या घटनेच्या माहितीची देवाणघेवाण झाली. भारत-चीनमध्ये करार झाल्यानंतर एकमेकांच्या हद्दीत चुकून प्रवेश केलेल्या सैनिकांना हवाली करण्याबद्दल सहमती झालेली आहे. त्या अनुषंगाने वँग लाँगला चीनकडे सोपवण्यात आले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: