सीआरपीएफचा गोळीबार हे हत्याकांडः ममतांचा आरोप

सीआरपीएफचा गोळीबार हे हत्याकांडः ममतांचा आरोप

कोलकाताः प. बंगालमधील कुचबिहारमध्ये शनिवारी मतदानादरम्यान सीआरपीएफच्या गोळीबारात ४ जण ठार झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व प. बंगालच्या मुख्यम

आमार कोलकाता – भाग ९ : बंगभोज
बंगालमध्ये नड्डा यांच्या गाडीवर दगडफेक
ममतांना अडचणीत आणण्यासाठी ओवेसी मैदानात

कोलकाताः प. बंगालमधील कुचबिहारमध्ये शनिवारी मतदानादरम्यान सीआरपीएफच्या गोळीबारात ४ जण ठार झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ममता बॅनर्जी यांनी सीआरपीएफ जवानांनी केलेला गोळीबार हा हत्याकांड असल्याचा आरोप केला असून अमित शहा यांनी सीआरपीएफच्या गोळीबाराला ममता बॅनर्जीच जबाबदार असल्याचा प्रत्यारोप केला आहे.

शनिवारी कुचबिहारमधील सीतालकुची येथे मतदानादरम्यान हिंसाचार झाला. यात सीआरपीएफच्या जवानांनी चार जणांना ठार मारले. हे सर्व जण जोरेपत्की या गावातील रहिवाशी असून त्यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार झाले. सीआरपीएफने आपण केलेला गोळीबार हा स्वयंसंरक्षणासाठी केल्याचा बचाव केला तर ममता बॅनर्जी यांनी हे सरळ सरळ हत्याकांड असल्याचा आरोप सीआरपीएफवर केला.

शनिवारी सीतालकुची मतदारसंघात एका भाजप कार्यकर्त्याला अज्ञातांनी गोळ्या घातल्यानंतर तृणमूल व भाजप कार्यकर्त्यांमध्येही तणाव निर्माण झाला आहे..

दरम्यान या घटनेचा अहवाल निवडणूक आयोगाने मागवला असून येत्या ७२ तास एकाही राजकीय नेत्याला या भागात येण्यास आयोगाने मनाई घातली आहे.

सीतालकुची घटनेनंतर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत सीआरपीएफने केलेले हे हत्याकांड असून ७२ तास या मतदारसंघात राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेट देण्यास बंदी घातली आहे. ही बंदी म्हणजे पुरावे नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे प्रयत्न असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. या देशाला अकार्यक्षम गृहमंत्री व सरकार लाभले असल्याची टीका त्यांनी केली. सीआरपीएफच्या जवानांना परिस्थिती कशी हाताळायची याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. राज्यात पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर आपण सीआरपीएफकडून जनतेची छळवणूक चालल्याचा इशारा दिला होता. नंदीग्राममध्येही आपण हा मुद्दा मांडला होता पण त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

दरम्यान नादिया जिल्ह्यात एका रोड शोमध्ये अमित शहा यांनी सीआरपीएफबाबत ममता बॅनर्जी यांना आदर नसल्याचा आरोप केला. ममता दीदींनी सीआरपीएफच्या गोळीबारात मरण पावलेल्यांबद्दल दुःख व्यक्त केले पण त्यांनी भाजप कार्यकर्त्याच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले नाही. कारण हा कार्यकर्ता राजभोंगशी समाजातील असून हा समाज त्यांचा मतदार नाही. ममता बॅनर्जी लोकांना सीआरपीएफला घेराव घाला असे आवाहन करत होत्या. त्यामुळे त्याच सीतालकुची घटनेला जबाबदार नाहीत का असा सवाल त्यांनी केला. सीआरपीएफच्या विरोधात चिथावणी त्यांनीच दिली असाही आरोप शहा यांनी केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0