विहिंप, बजरंग दलाच्या धमकीमुळे कुणाल कामरांचा कार्यक्रम रद्द

विहिंप, बजरंग दलाच्या धमकीमुळे कुणाल कामरांचा कार्यक्रम रद्द

गुडगावः विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या कट्टर हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावामुळे हास्यकलावंत कुणाल कामरा यांना त्यांचा हरियाणात होणारा कार्यक्रम रद्द

नांदेड स्फोटात उजव्या विचारसरणीच्या नेत्यांची भूमिका – माजी संघ स्वयंसेवकाचा दावा
मुनव्वर फारुकीचा शो रद्द करण्याची बजरंग दलाची मागणी
केरळमध्ये माकपा, कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या

गुडगावः विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या कट्टर हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावामुळे हास्यकलावंत कुणाल कामरा यांना त्यांचा हरियाणात होणारा कार्यक्रम रद्द करावा लागला. येत्या १७ व १८ सप्टेंबर रोजी गुडगाव सेक्टर २९मध्ये स्टुडिओ एक्सओ बार येथे त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पण विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांमार्फत पोलिस उपायुक्त निशांत कुमार यादव यांना एक पत्रक देऊन कामरा यांचा कार्यक्रम रद्द करावा अन्यथा तेथे उग्र निदर्शने केली जातील असा इशारा दिला. आपल्या पत्रात या संघटनांनी कुणाल कामरा हे हिंदू देवदेवतांची टिंगल करतात, अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यास मंजुरी दिल्यास त्याने  शहरात तणाव निर्माण होईल, त्याची जबाबदारी सरकारची असे नमूद करण्यात आले होते.

या पत्रावर प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही पण कोणताही तणाव वा वाद वाढण्यापेक्षा कार्यक्रम रद्द करणे योग्य ठरेल असे आयोजकांचे म्हणणे ठरले. स्टुडिओ बारचे व्यवस्थापक साहिल डावरा यांनी कामरा यांचा कार्यक्रम रद्द करण्याचा आमचा निर्णय झाला अशी प्रतिक्रिया दिली. आम्हाला कोणताही त्रास नको आहे. बजरंग दलाची दोन माणसे आमच्याकडे आले आणि त्यांनी कामरा यांचा कार्यक्रम झाल्यास तो बंद पाडण्यात येईल अशी धमकी दिली. कामरा यांचा कोणत्याही प्रकारचा येथे कार्यक्रम होता कामा नये असेही या दोघांचे म्हणणे होते, असे डावरा यांचे म्हणणे होते.

कुणाल कामरा यांचा कार्यक्रम रद्द व्हावा असा आग्रह बजरंग दलाचे जिल्हा समन्वयक प्रवीण सैनी ऊर्फ प्रवीण हिंदुस्तानी यांचा होता, त्यांच्यासोबत ७-८ कार्यकर्ते पोलिस ठाण्यात गेले व त्यांना आपले निवेदन दिले.

दरम्यान या कार्यक्रमासंदर्भात कुणार कामरा म्हणाले, माझा कार्यक्रम रद्द केल्याची कोणतीही माहिती माझ्यापर्यंत आयोजकांकडून आलेली नाही, त्या मुळे या संदर्भात मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. गेली पाच वर्षे मी सातत्याने बोलत आहे, आता सांगण्यासारखे काहीच उरलेले नाही, असे कामरा म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0