नुपूर शर्मा प्रकरण : ‘टाइम्स नाऊ’च्या नाविका कुमारविरोधात एफआयआर

नुपूर शर्मा प्रकरण : ‘टाइम्स नाऊ’च्या नाविका कुमारविरोधात एफआयआर

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर तीन आठवड्य

शेतकरी आंदोलन आणि नवउदारमतवाद
पाँचजन्यची अॅमेझॉनवरही टीका; भ्रष्टाचाराचा आरोप
देशद्रोह कायद्यात दुरुस्ती करण्याची सरकारची तयारी

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर तीन आठवड्यांनंतर ‘टाइम्स नाऊ’च्या नाविका कुमारचे नाव प्रथम माहिती अहवालात (एफआयआर) घेण्यात आले आहे.  नाविका कुमारने आयोजित केलेल्या प्राइमटाइम न्यूज शो दरम्यान शर्मा यांनी वक्तव्य केले होते. ‘न्यूजलँड्री’ने हे वृत्त दिले आहे.

परभणी येथील एका मुस्लिम धर्मगुरूने नानलपेट पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये कुमार यांच्यावर धार्मिक भावना भडकवण्याचा द्वेषपूर्ण हेतू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नवीन कुमार जिंदाल, नूपुर शर्मा.

नवीन कुमार जिंदाल, नूपुर शर्मा.

शर्मा यांच्या वक्तव्यामुळे भारतात आणि बाहेरही मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला होता. ‘टाइम्स नाऊ’ने २७ मे रोजी एक निवेदन जारी करून या वादग्रस्त वक्तव्यापासून स्वतःला दूर केले. चॅनेलने एका निवेदनात म्हटले आहे, “आम्ही आमच्या वादविवादातील सहभागींना संयम राखण्याचे आणि पॅनेलमधील सहकारी सदस्यांविरुद्ध असंसदीय भाषा बोलू नये असे आवाहन करतो.”

शर्मा यांच्या व्यतिरिक्त, कुमार यांना शोच्या हाताळणीबद्दल टीकेला सामोरे जावे लागले होते. प्रेषितांविरुद्धच्या विवादास्पद टिप्पणीमुळे अरब जगतात राजनैतिक संताप व्यक्त करण्यात आला आणि भारतात मोठ्या प्रमाणात निषेध झाला.

‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ने टाइम्स नाऊ सारख्या टीव्ही चॅनेलला “विषारी आवाजांना कायदेशीरपणा दिल्याबद्दल” प्रश्न विचारला आहे.

‘टाइम्स नाऊ’ला अशा टीकेला सामोरे जाण्याची आणि कुमार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये वक्त्यांनी केलेल्या व्यक्तव्यापासून स्वतःला दूर ठेवण्याची ही पहिलीच वेळ नाही.

नोव्हेंबर २०२१ मध्ये, कंगना रणौतने केलेल्या टिप्पण्यांमुळे वाद निर्माण झाला होता. १९४७ मध्ये भारताला जे मिळाले ती भीक होती आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सत्तेवर आल्यावरच २०१४ मध्ये खरे स्वातंत्र्य मिळाले, असे रणौत म्हणाली होती.

रणौतच्या वक्तव्यामुळे भाजप नेत्यांनीही संताप व्यक्त केला होता. हा “लाखो स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान” असल्याचे त्यांनी म्हटले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0