कर्नाटक : मुस्लिम मांस विक्रेत्यावर हिंदुत्ववादी संघटनांकडून हल्ला

कर्नाटक : मुस्लिम मांस विक्रेत्यावर हिंदुत्ववादी संघटनांकडून हल्ला

नवी दिल्लीः कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मांस विक्री करणाऱ्या एका मुस्लिम विक्रेत्याला मारहाण केल्याच

‘कोणत्याही विचारधारेची मुस्कटदाबी करता येत नाही’
‘चांगला मुस्लिम’ ठरण्याची व्यर्थ धडपड  
धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी मधु किश्वर यांच्यावर गुन्हा

नवी दिल्लीः कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मांस विक्री करणाऱ्या एका मुस्लिम विक्रेत्याला मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेनंतर शिमोगात तणावाचे वातावरण पसरले असून पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांना अटक केली.

गेले काही महिने कर्नाटकात मुस्लिम विद्यार्थ्यांना हिजाब बंदी, मंदिर परिसरात मुस्लिम व्यावसायिकांना व्यापार करण्यास बंदी असे वादग्रस्त निर्णय राबवले जात असताना आता मांस विक्री करणाऱ्या मुस्लिम विक्रेत्यांना कट्टरवादी हिंदुत्ववादी संघटना लक्ष्य करत आहेत. आता हलाल मांस विक्री करण्याच्या मुस्लिम व्यावसायिकांकडून मांस विकत घेऊ नये अशी मागणी भाजपच्याच एका आमदाराने केली होती. त्यानंतर दोन दिवसांनंतर शिमोगा जिल्ह्यात ही घटना घडली.

कर्नाटकात उगाडी हा हिंदू सण उत्साहात साजरा केला जातो. या सणाला मांसाहारी पदार्थ तयार केले जातात. या सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर मांस विक्री होत असल्याने व मांस विक्रेत्यांमध्ये बहुसंख्य मुस्लिम असल्याने हिंदू संघटना त्यांच्याकडून मांस विकत घेऊ नये असा प्रचार करताना दिसत आहेत.

बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व अन्य स्थानिक कट्टरवादी हिंदू संघटना घरोघरी जाऊन मुस्लिम विक्रेत्यांकडून हलाल मांस घेऊ नये असे सांगत आहेत. हलाल मांसविरोधात पत्रकेही मोठ्या प्रमाणात वाटली जात आहेत. सत्ताधारी भाजपकडून या संघटनांच्या प्रचाराला छुपी मदत दिली जात आहेत. २९ मार्चला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी हलाल मांसावर बंदी ही आर्थिक जिहादाची मागणी असल्याचे सांगितले. यावर मुख्यमंत्री बोम्मई यांनी रवी यांच्या मागणीवर सरकार विचार करेल असे सांगितले. आम्ही हे सर्व प्रकरण तपासून पाहू व त्यावर निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.

बोम्मई यांच्या विधानानंतर कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी हा विषय सरकारच्या मर्यादेत नसून जनताच यावर निर्णय घेईल असे विधान केले. त्यानंतर लगेचच शिमोगात भद्रावती येथे मुस्लिम मांस विक्रेत्यावर हल्ला करण्यात आला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: