नुपूर, जिंदालवर कारवाईसाठी देशात मुस्लिमांची निदर्शने

नुपूर, जिंदालवर कारवाईसाठी देशात मुस्लिमांची निदर्शने

नवी दिल्लीः प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर अवमानजनक टिका करणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवनीत जिंदाल यांच्याविरोधात कडक कारवाई क

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी १५ प्रश्न (त्यांनी कधी उत्तर द्यायचे ठरवलेच तर!)
‘मोदी सरकारच्या बेपर्वाईमुळे कोविड महासाथीत ४० लाख मृत’
प्रज्ञा ठाकूर यांची संरक्षण समितीवरून हकालपट्‌टी

नवी दिल्लीः प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर अवमानजनक टिका करणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवनीत जिंदाल यांच्याविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यासाठी देशभरातील अनेक शहरांत शुक्रवारी मुस्लिम समाजातील नागरिकांकडून निदर्शने करण्यात आली. ही निदर्शने दिल्लीतील जामा मशिदीपासून उत्तर प्रदेशातील सहारनपूर, लखनौ, मुरादाबाद, कानपूर, मथुरा, प्रयागराज, फिरोजाबाद शहरांत तर पूर्वेकडे कोलकाता येथील पार्क सर्कस, आसाम, पश्चिमेकडे महाराष्ट्र, राजस्थान, म. प्रदेश, दक्षिणेत कर्नाटकांतील काही शहरांमध्ये झाली.

शुक्रवारी नमाजाच्या निमित्ताने दिल्लीतील जामा मशिदीच्या परिसरात हजारो नागरिक हातात शर्मा यांच्या वक्तव्याच्या निषेधाचा फलक घोषणा देत होते. ही निदर्शने गेट क्रमांक १ जवळ झाली. सुमारे १५ ते २० मिनिटांनी पोलिसांनी निदर्शकांना पांगवले.

उत्तर प्रदेशात शुक्रवारच्या नमाजानंतर निदर्शने दिसून आली. सहारनपूर, मुरादाबाद, रामपूर, लखनौ येथे निदर्शक रस्त्यावर आले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. प्रयागराज येथे दगडफेकीच्या काही घटना घडल्या. या संदर्भातला व्हीडिओ सोशल मीडियात दिसून आला होता. निदर्शकांनी एडीजी पदाच्या पोलिस अधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सहारनपूर येथे निदर्शक व पोलिसांमध्ये दगडफेक दिसून आली. या प्रकरणी २१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

प. बंगालमध्ये कोलकाता शहरातील पार्क सर्कस भाग, पंचला, हावडा नजीकचा डोमजूर येथे शेकडो निदर्शक जमा झाले होते. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटनाही घडल्या.

झारखंडमध्ये रांची शहरातल्या मुख्य रस्त्यावर निदर्शक जमले होते. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला व हवेत गोळीबार केला. शहरांत काही भागांमध्ये संचारबंदीही पुकारण्यात आली आहे.

जम्मू व काश्मीरमध्येही श्रीनगर येथील लाल चौक, बातामालू, तेंगपोरा व काही ठिकाणी निदर्शने झाली.

महाराष्ट्रात औरंगाबाद, सोलापूर व नवी मुंबईत शेकडो निदर्शक रस्त्यावर उतरले होते.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0