कर्नाटकात बेड घोटाळा; तेजस्वी सूर्यांवर ध्रुवीकरणाचे आरोप

कर्नाटकात बेड घोटाळा; तेजस्वी सूर्यांवर ध्रुवीकरणाचे आरोप

बंगळुरूः कर्नाटकात कोरोनाची परिस्थिती भयावह असताना तेथे कोरोना रुग्णांना आरक्षित असणारे बेड पैसे घेऊन विकले जात असल्याची उदाहरणे उघडकीस आली आहेत. काँग

छ. शिवाजी महाराज पुतळा विटंबनेचा विधानसभेत निषेध
तरुणीने दिल्या पाकिस्तान-हिंदुस्तान झिंदाबादच्या घोषणा
श्री श्री रवीशंकर यांना विरोध

बंगळुरूः कर्नाटकात कोरोनाची परिस्थिती भयावह असताना तेथे कोरोना रुग्णांना आरक्षित असणारे बेड पैसे घेऊन विकले जात असल्याची उदाहरणे उघडकीस आली आहेत. काँग्रेसने या प्रकरणात भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या व भाजपचे एक आमदार यांना या भ्रष्टाचार प्रकरणात त्वरित अटक करावी अशी मागणी केली आहे.

बंगळुरूत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य सरकारने खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश पूर्वी दिले होते. पण अनेक कोरोनाबाधित रुग्णांना हे बेड मिळत नसून मोठ्या प्रमाणात पैसे मोजून राजकीय नेत्यांचे वशीले लावून बेड मिळत असल्याच्या तक्रारी कोरोना रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. अनेकांनी औषधेही काळ्याबाजारात घ्यावी लागत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणात ७ जणांना अटक केली असून ९० जणांना रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार केल्या प्रकरणात ताब्यात घेतले आहे.

तेजस्वी सूर्यांचे वादग्रस्त वक्तव्य

या पूर्वी शहरातील खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांना आरक्षित केलेले बेड मुस्लिम समुदायातील काही जणांकडून पैसे देऊन आरक्षित केले जात असल्याचा आरोप तेजस्वी सूर्या यांच्या समवेत सतीश रेड्डी व रवी सुब्रह्मण्यम या भाजप आमदारांनी केले होते. ४ मे रोजी तेजस्वी सूर्या यांनी बनावट नावाने शहरातील ४,६६५ बेड आरक्षित झाल्याचा दावा केला होता. या बेडवर कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे रुग्ण ठेवण्यात आले होते असा आरोप सूर्या यांनी केला होता.

सूर्या यांनी १६ मुस्लिमांची नावे घेतली होती. या मुस्लिम व्यक्ती एका कंपनीत काम करत आहेत. ही कंपनी कोरोना रुग्णांना बेड मिळवून देण्याचे काम करत आहे. यामुळे राजकारण तापले होते.

या वर विरोधी काँग्रेस पक्षाने सतीश रेड्डी यांच्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. तेजस्वी सूर्या, रेड्डी यांना भ्रष्टाचार होत असल्याचे माहिती होते तर ते १० दिवस यावर का मौन बाळगून होते, असा सवाल काँग्रेसने केला आहे. कोरोनाच्या काळात धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न भाजपचे हे नेते करत असून स्वतःच्या पक्षाच्या मुख्य नेत्यांचे अपयश झाकण्यासाठी रस्त्यावर काम करणारे कार्यकर्ते, आरोग्य सेवक यांना बळीचा बकरा बनवला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी केला आहे.

तेजस्वी सूर्या यांनी ज्या १६ मुस्लिमांची नावे घेतली आहेत, त्या कंपनीच्या प्रशासनाने आमच्या कंपनीत २१४ अन्य व्यक्ती कामे करत असून आमच्याकडे कोणत्याही व्यक्तीला जात, धर्म पाहून कामावर घेतले जात नाही, असे स्पष्ट केले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: