काँग्रेस नेते शरद रणपिसे यांचे निधन

काँग्रेस नेते शरद रणपिसे यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कॉँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे आज निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. शरद रणपिसे यांच्यावर पुण्यातील

‘एअर इंडिया’ अखेर टाटांकडे
स्वतंत्र राजकारणाच्या दिशेने ‘वंचित आघाडी’
सुप्रीम कोर्टाकडूनही बाबा रामदेवांना समज

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कॉँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे आज निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. शरद रणपिसे यांच्यावर पुण्यातील जोशी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

रणपिसे यांना हर्नियाच्या ऑपरेशननंतर हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती. गेल्या आठवड्यापासून रणपिसे आजारी होते. गेले चार दिवस त्यांना रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आमदार शरद रणपिसे यांचा जन्म १४ सप्टेंबर १९५१ रोजी पुण्यात झाला होता. त्यांनी पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून आपल्या राजकीय प्रवासाची सुरवात केली. रणपिसे हे १९७९-८५ या कालावधीत पुणे महापालिकेचे नगरसेवक, तर त्यानंतर १९८३-८४ ला गलिच्छ वस्ती निर्मूलन, गृहनिर्माण आणि समाज कल्याण समितीचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर १९९४-९५ मध्ये ते उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळावर सदस्य होते. त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0