स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; नेहरुंचे छायाचित्र वगळले

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; नेहरुंचे छायाचित्र वगळले

नवी दिल्लीः भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव कार्यक्रमात पहिले पंतप्रधान पं. जवाहर लाल नेहरू यांचे डिजिटल छायाचित्र इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिस

बेकायदा पदच्युती, हेरगिरी आणि आता माहितीपासूनही वंचित
सरकारमधून बाहेर पडण्यास तयार – राऊत
उ. प्रदेश पोलिसांच्या नोटीसा बेकायदा – विधिज्ञांचे मत

नवी दिल्लीः भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव कार्यक्रमात पहिले पंतप्रधान पं. जवाहर लाल नेहरू यांचे डिजिटल छायाचित्र इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च (आयसीएचआर)ने प्रसिद्ध न केल्याने वाद उत्पन्न झाला आहे. काँग्रेसने आयसीएचआरच्या या कृतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांनी सरकारच्या गलिच्छ व तुच्छतापूर्ण राजकारणाचा धिक्कार केला आहे. आयसीएचआरच्या वेबसाइटवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या छायाचित्रात पं. नेहरू सोडून म. गांधी, डॉ. आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी बोस, राजेंद्र प्रसाद, भगत सिंग, मदनमोहन मालवीय व सावरकर यांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

प. नेहरूंचे डिजिटल छायाचित्र हेतूपुरस्सर प्रसिद्ध न करण्याच्या आयसीएचआरच्या कृतीवर विविध राजकीय पक्ष व समाजातील विविध घटकातून टीका झाल्यानंतर खडबडून जाग आलेल्या या संस्थेने पुढे प्रसिद्ध होणार्या डिजिटल छायाचित्रांत पं. नेहरु यांचे छायाचित्र असेल अशी सारवासारव केली. आयसीएचआरचे संचालक ओमजी उपाध्याय यांनी हे केवळ पहिले डिजिटल छायाचित्र आहे, अन्य डिजिटल छायाचित्र क्रमाक्रमाने प्रसिद्ध होणार आहेत. पहिल्याच डिजिटल छायाचित्रावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही, असे उत्तर दिले. आम्ही स्वातंत्र्य चळवळीतील कोणाचेही अवमूल्यन करत नाही. इतिहासाच्या प्रमुख पुस्तकात नमूद नसणार्यांच्याही योगदानाला लोकांपर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे उपाध्याय म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: