आसामः भाजपच्या जाहिरातीवरून ८ वर्तमानपत्रांविरोधात गुन्हा

आसामः भाजपच्या जाहिरातीवरून ८ वर्तमानपत्रांविरोधात गुन्हा

गुवाहाटीः मतमोजणी होण्याआधीच अप्पर आसाममधील सर्व जागा भाजपने जिंकल्याची जाहिरात बातमी स्वरुपात प्रसिद्ध केल्याने निवडणूक आयोगाने ८ वर्तमानपत्रांना नोट

भाजप ‘असमर्थ’, शिवसेनेला निमंत्रण
ड्रग्ज पार्टी : एनसीबीच्या धाडीत भाजपचा कार्यकर्ता
भीमा-कोरेगाववरून केंद्र आणि राज्य आमने सामने

गुवाहाटीः मतमोजणी होण्याआधीच अप्पर आसाममधील सर्व जागा भाजपने जिंकल्याची जाहिरात बातमी स्वरुपात प्रसिद्ध केल्याने निवडणूक आयोगाने ८ वर्तमानपत्रांना नोटीस पाठवली आहे व त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवले आहे.

त्याच बरोबर काँग्रेसने या संदर्भात ८ वर्तमानपत्रे, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, प्रदेशाध्यक्ष रंजीत कुमार दास यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

अप्पर आसाममधील पहिल्या टप्प्याचे मतदान २७ मार्चला झाले होते. हे मतदान ४७ जागांसाठी झाले असून दुसर्या दिवशी भाजपने अत्यंत खुबीने या सर्व जागा आपण जिंकल्याची जाहिरात बातमी स्वरुपात २८ मार्चला प्रसिद्ध करवून घेतली.

अशा प्रकारच्या जाहिराती देऊन भाजपने आचार संहिता, लोकप्रतिनिधी कायदा १९५१ मधील १२६ अ तरतूद व २६ मार्चला निवडणूक आयोगाने जारी केलेली मार्गदर्शक तत्वे यांचा सरळ सरळ भंग केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ही तक्रार दिसपूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

ही जाहिरात आसाममधील नियोमिया बार्ता, आसाम ट्रिब्यून, असोमिया प्रतिदिन, आमार असोम, असोमिया खबोर, दैनिक आसाम, दैनिक जुगसंख व दैनिक पूर्वोदय या इंग्रजी, आसामी, हिंदी व बंगाली भाषिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती.

भाजपच्या या जाहिरातबाजीला उत्तर म्हणून काँग्रेसने ३० मार्चला १५ वर्तमानपत्रात संपूर्ण आसाममध्ये काँग्रेसची लाट आली असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0