काँग्रेस-पायलट गटांत तोडगा

काँग्रेस-पायलट गटांत तोडगा

राजस्थानमधील काँग्रेसमधील राजकीय पेचप्रसंग सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी रात्री माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्

गेहलोत सरकारला जोशी मदत करतील का?
प्रधानमंत्री पीक विमा योजना धोक्यात
सर्वोच्च न्यायालयाकडून पायलट गटाला दिलासा

राजस्थानमधील काँग्रेसमधील राजकीय पेचप्रसंग सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी रात्री माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी हा वाद संवादाने सुटू शकतो अशी भूमिका प्रकट केली. आमचे काही मुद्दे वैचारिक होते व ते मांडणे महत्त्वाचे होते. ते आम्ही पक्षाध्यक्षांपुढे व काँग्रेस कार्यकारिणी समितीपुढे मांडले आहेत, असे पायलट यांनी पत्रकारांना सांगितले.

काँग्रेसनेही पायलट यांच्याशी जुळवून घेण्याची तयारी दाखवली आहे. पायलट यांना सन्मानाने पक्षात सामावून घेतले जाईल व त्यांच्या सर्व तक्रारी ऐकून घेतल्या जातील असेही म्हटले आहे.

सोमवारी पायलट यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली. प्रियंका व राहुल या दोघांसोबत त्यांनी चर्चा केली व त्यातून सहमतीचा मार्ग निर्माण झाला. पायलट यांनी प्रियंका गांधी यांचेही आभार मानले.

काँग्रेसने पायलट यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी तीन सदस्यांची एक समिती नेमली आहे. या समितीत प्रियंका गांधी, अहमद पटेल व वेणुगोपाल हे काँग्रेसचे नेते असतील. ही समिती राजस्थानमधील परिस्थिती जाणून घेणार आहे. पायलट यांच्या सर्व तक्रारी दूर करण्याचे प्रयत्न केले जातील, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिल्याचे पायलट गटांतील सूत्रांनी सांगितले. यापुढे आणखीही काही बैठका होतील असेही सांगण्यात आले.

बंडखोर भंवर लाल शर्मा यांचा यू टर्न

सचिन पायलट यांच्या गटात गेलेले काँग्रेसचे निलंबित नेते भंवर लाल शर्मा यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेऊन आपण मुख्यमंत्र्यांसोबत असल्याचे जाहीर केले. याच शर्मा यांची एक कथित ऑडिओ टेप बाहेर आली होती. या टेपमध्ये गेहलोत सरकार पाडण्याचे कारस्थान शर्मा रचत असल्याचे संभाषण होते.  

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0