काँग्रेसच्या रजनी पाटील राज्यसभेवर बिनविरोध

काँग्रेसच्या रजनी पाटील राज्यसभेवर बिनविरोध

मुंबईः महाराष्ट्रातल्या एकमेव राज्यसभा जागेसाठी होणार्या निवडणुकीने सोमवारी वेगळेच वळण घेतले. भाजपने आपले उमेदवार संजय उपाध्याय यांची उमेदवारी मागे घे

केरळात ई. श्रीधरन भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
‘शेवटी माझे नाव तर स्टॅलिनच आहे!’
महाराष्ट्राची विस्कटलेली राजकीय घडी

मुंबईः महाराष्ट्रातल्या एकमेव राज्यसभा जागेसाठी होणार्या निवडणुकीने सोमवारी वेगळेच वळण घेतले. भाजपने आपले उमेदवार संजय उपाध्याय यांची उमेदवारी मागे घेतल्याने काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील या बिनविरोध निवडून आल्या. ही जागा काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झाली होती.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा हालचाली महाविकास आघाडी सरकारकडून सुरू होत्या. आघाडीतल्या नेत्यांनी भाजपशी त्या संदर्भात संपर्कही साधला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून उपाध्याय यांची उमेदवारी मागे घ्यावी अशी विनंती केली होती.

त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या बाबत या भूमिका घेतायेत त्यावर पुढच्या हालचाली अवलंबून होत्या. पाटील यांनी हा विषय पक्षाच्या कोअर कमिटीपुढे ठेवला. या कमिटीत विचार विनिमय झाल्यानंतर संजय उपाध्याय यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे काँग्रेसच्या रजनी पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या २८८ असून काँग्रेसचे ४४, राष्ट्रवादीचे ५४ व शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. या सर्वांची बेरीज १५४ होते. तर भाजपकडे १०५ आमदार आहेत. उरलेले २९ आमदार अपक्ष व अन्य पक्षाचे असून महाविकास आघाडीला २९ मधील १५ आमदारांचा पाठिंबा आहे तर भाजपला १४ आमदारांचा पाठिंबा आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0