कोरोना : जगात ३० हजार बळी, अमेरिका नवे केंद्र

कोरोना : जगात ३० हजार बळी, अमेरिका नवे केंद्र

कोरोना विषाणू संसर्गाचे सोमवार पहाटे अखेर जगभरात ३० हजाराहून अधिक मृत्यू झाले असून इटलीमध्ये कोरोनामुळे मरणार्यांची संख्या १ हजाराहून अधिक आहे. त्याचब

कोरोनाच्या संकटाला आपण सर्वच जबाबदारः मोहन भागवत
कोरोना आणि औषधशास्त्र
कोरोनाः मजुरांच्या जप्त सायकली विकून २३ लाख कमावले

कोरोना विषाणू संसर्गाचे सोमवार पहाटे अखेर जगभरात ३० हजाराहून अधिक मृत्यू झाले असून इटलीमध्ये कोरोनामुळे मरणार्यांची संख्या १ हजाराहून अधिक आहे. त्याचबरोबर अमेरिका आता जगाचे प्रमुख कोरोना केंद्र झाले असून तिने चीन व इटलीला मागे टाकले आहे.

संपूर्ण अमेरिकेवर आलेले हे संकट पाहता सरकारने न्यू यॉर्क, न्यू जर्सी व कनेक्टिकट शहरात राहणार्या नागरिकांना पुढील दोन आठवड्यांसाठी कुठेही प्रवास करू नये असे आवाहन केले आहे. अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण न्यूयॉर्क येथे आढळले आहेत. सध्या न्यू यॉर्कमध्ये ८,५०३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, त्यापैकी २८२ रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे तर ९६५ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी मृतांचा आकडा ७२८ इतका होता.

न्यू यॉर्कमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५९,३१३ इतकी झाली असून १,७२,३६० नागरिकांची कोरोनाची चाचणी झाली आहे. एकट्या न्यू यॉर्कमधील ७३० पोलिसांना कोरोनाची लागण झालेली आहे.

रविवारी स्पेनमध्ये ८३८ रुग्णांचा मृत्यू झाला. हा आकडा सर्वाधिक नोंदला गेला पण त्याचबरोबर नव्या रुग्णांच्या संख्येत कमतरता दिसून आली. देशात एकूण मृतांची संख्या ६,५२८ इतकी नोंदली गेली आहे.

नेदरलँडमध्ये कोरोनाचे बाधितांची संख्या १० हजाराच्या पुढे

संपूर्ण नेदरलँड देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १०,८६६ झाल्याचे रविवारी आरोग्य खात्याने सांगितले तर अद्याप मृतांची संख्या ७७१ झाली आहे. शनिवारी एका दिवसांत १३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

ब्रिटनमध्ये एका दिवसात २०९ रुग्णांचा मृत्यू 

ब्रिटनमध्ये एका दिवसांत २०९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण आकडा १,२२८ झाला आहे. रविवारी २,४३३ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले. देशात एकूण रुग्णांची संख्या १९,५२२ इतकी आहे.

स्वित्झर्लंडमध्ये १ हजार रुग्णांची नोंद

गेल्या २४ तासात स्वित्झर्लंडमध्ये १,१२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून देशातील एकूण रुग्णांचा आकडा १४,३३६ इतका झाला आहे. तर मृतांची संख्या २५७ इतकी झाली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: