२७.११ टक्के बेरोजगारी, संघटित क्षेत्रावरही नोकर कपातीचा दबाव

२७.११ टक्के बेरोजगारी, संघटित क्षेत्रावरही नोकर कपातीचा दबाव

नवी दिल्ली : कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याची आकडेवारी ‘सेंटर फॉर मॉन

रोजगार नसल्याने पित्याकडून नवजात मुलीची विक्री
रोजगार व कर्जपुरवठ्यासाठी नवे पॅकेज
बेकारीच्या दराने गाठला ४५ वर्षांतील उच्चांक!

नवी दिल्ली : कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याची आकडेवारी ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई)ने जाहीर केली आहे. त्यांच्या अहवालात ३ मे पर्यंत देशातील बेकारी २७.११ टक्के झाल्याचे म्हटले आहे.

या रिपोर्ट संदर्भात इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तात १५ मार्चपर्यंत भारतातील बेकारी ६.७४ टक्के इतकी होती तर ती ३ मे रोजी २७.११ टक्के इतकी वाढली आहे. शहरात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे २९.२२ टक्के असून कोरोनाचे जे रेड झोन आहेत तेथे बेकारी अधिक असल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागातील बेकारीही वाढत असून ती २६.६९ टक्के इतकी झाली आहे.

२६ एप्रिलला शहरातील बेरोजगारी २१.४५ टक्के तर ग्रामीण भागातील टक्केवारी २०.८८ इतकी होती.

सीएमआयईच्या रिपोर्टनुसार ग्रामीण भागापेक्षा शहरात लॉकडाऊनचा फटका जोरदार बसला असून हजारो सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग बंद झाल्याने लाखो श्रमिक, मजूरांचे हाल होत आहेत. शहरात फेरीवाले, रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे, रिक्षा चालक, अशा वर्गालाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे.

एप्रिल अखेर राज्यवार बेरोजगारीची आकडेवारी खालील प्रमाणे..

पुड्डूचेरी – ७५.८ टक्के, तामिळनाडू -४९.८ टक्के, झारखंड – ४७.१ टक्के, बिहार – ४६.६ टक्के, हरियाणा – ४३.२ टक्के, कर्नाटक – २९.८ टक्के, उ. प्रदेश, २१.५ टक्के, महाराष्ट्र – २०.९ टक्के , उत्तराखंड – ६.५ टक्के, सिक्कीम – २.३ टक्के, हिमाचल प्रदेश, २.२ टक्के.

सीएमआयईच्या रिपोर्टनुसार देशातील सुमारे १२ कोटी २० लाख लोकांना आपला रोजगार गमवावा लागला असून त्यात छोट्या मोठ्या उद्योगात काम करणारे श्रमिक, फेरीवाले, रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे, रस्त्यावर विक्री करणारे, रिक्षा चालक, नाश्ता-चहा-कॉफी व अन्य खाद्य पदार्थांचा स्टॉल लावणार्यांवरही बेरोजगारीची कुर्हाड कोसळली आहे.

संघटित क्षेत्रावरही बेकारीची संक्रांत

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात असंघटित क्षेत्रातील रोजगारावर गदा आली होती पण आता लॉकडाऊन वाढवत नेल्याने संघटित क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार कपात होऊ लागले आहेत. अनेक स्टार्टअपने ले-ऑफची घोषणा केली आहे. मध्यम व मोठ्या कॉर्पोरेट उद्योगांनीही आपल्या कर्मचार्यांना नोकर कपात होईल अशी कल्पना देण्यास सुरूवात केली आहे.

लॉकडाऊन पुकारण्या अगोदर नोकरी शोधणार्यांची संख्या ३५.४ टक्के इतकी होती ती आता ३६.२ टक्के इतकी वाढली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0