कोरोना : राज्यातील आकडा ४१

कोरोना : राज्यातील आकडा ४१

मुंबई : शहरात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या एका ६४ वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी मृत्यू झाला. देशातील कोरोना संक्रमणाचा हा तिसरा मृत्यू असून देशभरात कोरोन

कोरोना संकटातून सामाजिक परिवर्तन शक्य आहे का?
राज्यात ऑक्सिजनचा दररोजचा वापर वाढला
निजामुद्दीन मरकज : ४४१ जण कोरोनाबाधित, ७ जणांचा मृत्यू

मुंबई : शहरात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या एका ६४ वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी मृत्यू झाला. देशातील कोरोना संक्रमणाचा हा तिसरा मृत्यू असून देशभरात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १३९ झाली असून महाराष्ट्रातली आकडेवारी मंगळवार रात्र अखेर ४१ होती. मंगळवारी पिंपरी चिंचवडमधील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर मुंबईत कोरोनाचा एक रुग्ण सापडला. पुण्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १७ झाली आहे.

देशातील १३९ कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये २२ रुग्ण विदेशी आहेत. तर १३ जणांना योग्य उपचारानंतर घरी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात केरळमधील तीन रुग्णांचा समावेश आहे.

सरकारकडून खासगी प्रयोगशाळेत कोरोनाची चाचणी घेण्यासंदर्भातही प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

मुंबईची जीवनवाहिनी सुरूच राहणार

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सरकारी कार्यालये व मुंबईतील लोकल व बससेवा काही दिवस बंद ठेवण्याच्या अफवा दिवसभर फिरत होत्या. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटची एक बैठक घेऊन लोकल सेवा व बस सेवा बंद करणार नाही, असे स्पष्ट केले. असा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही पण लोकांनी अनावश्यक असा प्रवास टाळावा असा सल्लाही त्यांनी दिला. सरकारी कार्यालयेही नेहमीसारखी सुरू राहतील पण काम असेल तरच सरकारी कार्यालयात जावे असेही ते म्हणाले. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहावीत पण अन्य वस्तूंची दुकाने बंद राहावीत अशी विनंती त्यांनी केली. मुंबईतील सिद्धीविनायक, शिर्डीतील साईबाबा देवस्थान बंद ठेवल्याबद्दल ठाकरे यांनी आभार मानले.

प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट १० रु.हून ५० रु. इतके वाढवले आहे. या दरवाढीमुळे प्लॅटफॉर्मवरची अनावश्यक गर्दी कमी होईल असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. प. रेल्वेच्या अखत्यारित सहा डिवीजन येतात त्यात मुंबई, रतलाम, बडोदा, भावनगर, अहमदाबाद, व राजकोट यांचा समावेश आहे. या मार्गावर २५० स्थानके येतात. तर म. रेल्वेच्या अखत्यारित मुंबईसह, नागपूर, भुसावळ, पुणे व सोलापूर असे भाग येतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: