वैद्यकीय उपकरणे लवकर मिळावी : डॉक्टर व वैज्ञानिकांचे आवाहन

वैद्यकीय उपकरणे लवकर मिळावी : डॉक्टर व वैज्ञानिकांचे आवाहन

नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्गाच्या या संकट काळात देशातील विविध वैज्ञानिक संस्था व डॉक्टरांनी केंद्र सरकारकडे वैद्यकीय उपकरणे त्वरित मिळण्यात यावीत

‘तिसऱ्या लाटेचा धोका आहेच, नियमांचे पालन हवे’
स्वीडनचा लॉकडाऊनला नकार, समाजावर जबाबदारी
प्रेमाची आर्त गोष्ट

नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्गाच्या या संकट काळात देशातील विविध वैज्ञानिक संस्था व डॉक्टरांनी केंद्र सरकारकडे वैद्यकीय उपकरणे त्वरित मिळण्यात यावीत, अशी विनंती केली आहे. या गटाने २१ दिवसाच्या लॉकडाऊनचे समर्थन केले आहे. गेल्या काही दिवसांत जगाच्या तुलनेत भारतात कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण कमी आहे ते पूर्वी योजलेल्या उपाययोजनांचे फलित आहे पण आगामी काळात केंद्र व राज्य सरकारदरम्यान सर्व खात्यांमध्ये, संस्थांमध्ये समन्वय साधण्याची गरज आहे, प्रत्येकाने एकमेकांना सहकार्य देण्याची गरज आहे, असे या संशोधक, डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सध्या ज्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत, त्याचे पालन केल्यास लॉकडाऊनची मर्यादा वाढवण्याची गरज भासणार नाही. पण सध्या प्रत्यक्षात काम करणारे हजारो डॉक्टर, आरोग्य सेवक, स्वयंसेवक, रुग्णालयांतील असंख्य कर्मचारी, पोलिस, प्रशासनातील कर्मचारी यांना योग्य ती सुरक्षा उपकरणे वेळेत मिळण्यासाठी सरकारने वेगाने प्रयत्न करावेत, त्याने कोरोनाला आपण परतावून लावू असे संशोधक व डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांना, रोजंदारीवर काम करणार्या लाखो कष्टकरी, मजुरांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय योग्य असल्याचेही संशोधक व डॉक्टरांचे म्हणणे आहे. आता प्रत्येक प्रांत, जिल्ह्यात टास्क फोर्स तयार करून गरजूंपर्यत जीवनावश्यक वस्तू, सेवा, औषधे, जेवणादी बाबी पोहोचवण्याचे प्रयत्न करायला हवेत, असे या मंडळींचे म्हणणे आहे. जे मजूर, कामगार, कष्टकरी, नोकरदार या लॉकडाउनमध्ये फसलेले आहेत, जे आपल्या घरी जाऊ शकलेले नाहीत, त्यांच्यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर देशात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना तयार करून सर्व राज्यात ही योजना सुरू करावी व त्याद्वारे कोरोना बाधित रुग्णांना उपचार मिळू शकेल, अशी सूचना वैज्ञानिकांनी केली आहे.

देशातील क्रीडांगणे, मोठी मैदाने, रिकामी हॉटेल यांच्यामध्ये विलगीकरण कक्ष उभे करण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत, तसेच प्रत्येक राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नजीक कोरोनाचे परीक्षण करणारी केंद्रे उभी करावीत, अशी विनंती या समूहाने केली आहे.

जनतेलाही आवाहन

वैज्ञानिक व डॉक्टरांच्या या समुहाने कोरोना विषाणूवरचा इलाज हा कोणत्याही चमत्काराने, जादूटोण्याने बरा होऊ शकत नाही आणि जनतेने अशा कोणत्याही अफवांवर व प्रचाराला बळी पडू नये असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या भीतीने अनेकांनी घरी औषधे व अँटिबायोटिकची साठेबाजी केली आहे, ती त्यांनी करू नये. कोरोनाची पडताळणी योग्य व अधिकृत रुग्णालयात करावी. प्रत्येक नागरिकाने घरीच राहावे. वृद्धांना घराबाहेर पडण्यास परवानगी देऊ नये, मुलांनाही घरात राहण्यास सांगावे असेही आवाहन वैद्यकीय गटाने केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0