राज्यामध्ये कठोर निर्बंध, आठवड्याच्या शेवटी लॉकडाऊन

राज्यामध्ये कठोर निर्बंध, आठवड्याच्या शेवटी लॉकडाऊन

संपूर्ण राज्यांमध्ये उद्या रात्री (५ एप्रिल) ८ वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली असून, दिवसभर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी संध्याकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

‘मलाही जातीय शक्तींना गोळ्या घालायच्या आहेत’
वसाहतवादविरोधी भारतीयांनी पॅलेस्टाइनला पाठिंबा दिलाच पाहिजे!
पोलंडमध्ये विरोधी पक्षनेत्यावर पिगॅसस हेरगिरी

संपूर्ण राज्यांमध्ये उद्या रात्री (५ एप्रिल) ८ वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली असून, दिवसभर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी संध्याकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आले. कोरोनाची साथ रोखण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर निर्णय घेण्यात आला. याबाबत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली.

राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असे मलिक यांनी सांगितले. सर्व मॉल्स, हॉटेल्स, बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होम डिलिव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. जिथे कामगारांना राहण्याची व्यवस्था आहे, अशा ठिकाणची बांधकामं सुरू राहणार असून, मंडईत निर्बंध नसतील, पण गर्दी कमी करण्यासाठी नियम करण्यात आले आहेत.

शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार असून, उद्योग संपूर्ण क्षमतेनं सुरू राहणार आहेत. कामगारांवर मात्र कोणतीही बंधने घालण्यात आलेली नाहीत.

“राज्यात शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कठोर लॉकडाऊन लागू असणार आहे. हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्यांशी, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याशीही चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत हॉटेल व्यावसायिक, उद्योजक, जीम चालक आणि सिनेसृष्टीतील प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असताना एकी दिसली पाहिजे, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा केली,” असे नवाब मलिक म्हणाले.

लॉकडाऊनच्या काळामध्ये राज्यातील सर्व बागा, चौपाट्या, धार्मिक स्थळं बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र या काळात सार्वजनिक आणि खासगी वाहतूकीवर कोणतेही निर्बंध नसतील असेही मलिक यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0