इराणमधील २५५ भारतीयांना कोरोनाची लागण

इराणमधील २५५ भारतीयांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : इराणमध्ये २५५, संयुक्त अरब अमिरातीमध्ये १२ व इटलीमधील ५, हाँगकाँग, कुवेत, रवांडा व श्रीलंकेतील प्रत्येक एक भारतीय नागरिकाला कोरोना विषाणू

औषध साठेबाजीः गौतम गंभीरवर कारवाई होणार
५ राज्यात लसीकरण गती वाढवा; निवडणूक आयोगाचे निर्देश
‘मैत्री’चा हात, ‘मित्रा’ची साथ !

नवी दिल्ली : इराणमध्ये २५५, संयुक्त अरब अमिरातीमध्ये १२ व इटलीमधील ५, हाँगकाँग, कुवेत, रवांडा व श्रीलंकेतील प्रत्येक एक भारतीय नागरिकाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे सरकारने बुधवारी लोकसभेत सांगितले. परराष्ट्रमंत्री वी. मुरलीधरन यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

सोमवारी इराणहून ५३ भारतीय नागरिकांचा एक गट भारतात परतला. इराणने आजपर्यंत त्यांच्या देशात कोरोनाची लागण झालेल्या ३८९ नागरिकांना मायदेशी पाठवले आहे.

कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांची संख्या चीन, इटलीनंतर इराणमध्ये सर्वाधिक आहे, सध्या या देशात एक हजाराहून अधिक नागरिकांना कोरोना लागण झाल्याचे इराणच्या प्रशासनाने सांगितले आहेत.

इराणमध्ये भारताचे सहा हजार नागरिक असून त्यामध्ये ११०० यात्रेकरून आहेत. हे यात्रेकरू लडाख व जम्मू व काश्मीरचे आहेत.

देशातील करोनाची संख्या १५०

बुधवारी देशातील विविध राज्यांतून कोरोनाची लागण झालेले १० रुग्ण सापडले असून देशभरातला आकडा १५० झाला आहे. दिल्ली, कर्नाटक व महाराष्ट्रातील तीन नागरिक आहेत तर २५ विदेशी नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा ४१ झाला असून केरळमध्ये २७  तर कर्नाटकात ११ रुग्ण आहेत. दिल्लीत १० रुग्ण आढळले आहेत त्यात एक विदेशी आहे. लडाखमध्ये ८, जम्मू व काश्मीरमध्ये ३, तेलंगणामध्ये ५, राजस्थानमध्ये ४, तामिळनाडू, आंध्र, ओदिशा, उत्तराखंड, पंजाबमध्ये प्रत्येकी १ तर हरियाणामध्ये १६ रुग्ण सापडले आहेत. हरियाणात १६ मध्ये १४ रुग्ण विदेशी आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0