ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर हायड्रोक्सिक्लोरोक्विन अमेरिकेस निर्यात

ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर हायड्रोक्सिक्लोरोक्विन अमेरिकेस निर्यात

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला इशारा दिल्यानंतर केंद्र सरकारने हायड्रोक्सिक्लोरोक्विन हे मलेरिया प्रतिबंधक व पॅरॅसिटॅमोल ह

‘क्वाड’च्या निमित्ताने भारतासमोर पेच
बौद्धिक संपदा अधिकार म्हणजे काय? : भाग १
अमेरिका-इराण संघर्षात भारताचा बळी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला इशारा दिल्यानंतर केंद्र सरकारने हायड्रोक्सिक्लोरोक्विन हे मलेरिया प्रतिबंधक व पॅरॅसिटॅमोल ही औषधे अमेरिकेसह अन्य देशांना निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेसह श्रीलंका व नेपाळने या औषधांचीही भारताकडे मागणी केली होती.

हायड्रोक्सिक्लोरोक्विन हे मलेरियावरचे स्वस्त औषध असून ते कोरोना विषाणूमुळे निर्माण होणार्या आजारावर एक तात्पुरता उपचार म्हणून वापरता येऊ शकते असे सध्या समजले जात आहे.

अमेरिकेत कोरोना विषाणू बाधितांची संख्या तीन लाखापेक्षा अधिक झाली असून मृतांचा आकडाही ११ हजारांवर गेला आहे. संपूर्ण अमेरिकेत कोरोनामुळे हाहाकार माजला असून रुग्णांची वाढती संख्या व रुग्णालयांची कमतरता अशा कात्रीत अमेरिकेची आरोग्य व्यवस्था अडकली आहे.

गेल्या आठवड्यात रविवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने हायड्रोक्सिक्लोरोक्विन औषधांची निर्यात करावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीवरून सांगितले होते पण हायड्रोक्सिक्लोरोक्विन औषधाची मागणी वाढल्यानंतर सरकारने या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे सोमवारी ट्रम्प यांनी हायड्रोक्सिक्लोरोक्विन औषधांची लवकर निर्यात न केल्यास त्याचे भारताला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला.

आमची रविवारी सकाळीच त्यांच्याशी (मोदींशी) चर्चा झाली होती. त्यात हायड्रोक्सिक्लोरोक्विनच्या निर्यातीस परवानगी दिल्यास त्याचे आम्ही स्वागत करू असे म्हटले होते, असे ट्रम्प म्हणाले. जर त्यांनी (मोदींनी) तसे निर्णय घेतले नाही तर ठीक आहे पण त्याचे परिणाम त्यांना निश्चितच भोगावे लागतील. आमचे भारताशी चांगले संबंध आहेत त्यामुळे आश्चर्य वाटते. आम्हाला औषधे न मिळाल्यास त्यावर तोडगा काढू असे ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.  अमेरिकेने आजपर्यंत भारताला व्यापारात अनेकदा फायदा करून दिला आहे, याचीही आठवण त्यांनी करून दिली.

केंद्र सरकार खडबडून जागे झाले

ट्रम्प यांच्या इशार्यानंतर लगेचच परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अनुराम श्रीवास्तव यांनी कोरोना महासाथीचे एकूण जगावर आलेले संकट पाहता मानवतावादी दृष्टिकोनातून शेजारील देश व अन्य देशांना पर्याप्त पॅरॅसिटॅमॉल व हायड्रोक्सिक्लोरोक्विन औषधे पाठवण्यात येतील असे स्पष्ट केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0