२१ दिवसांसाठी भारत लॉक डाऊन

२१ दिवसांसाठी भारत लॉक डाऊन

नवी दिल्ली – कोरोना विषाणूच्या संसर्गाचे संपूर्ण देशावर व जगावर होत असलेले भीषण परिणाम पाहता भारत हा पुढे २१ दिवस लॉक डाऊन राहील अशी घोषणा पंतप्रधान न

भिवंडीत अडकले लाखो कामगार
भारतात ४० कोटी बेरोजगार : आंतरराष्ट्रीय मजूर संघटना
शिक्षक, शिक्षकेतरांचे लसीकरण आवश्यक

नवी दिल्ली – कोरोना विषाणूच्या संसर्गाचे संपूर्ण देशावर व जगावर होत असलेले भीषण परिणाम पाहता भारत हा पुढे २१ दिवस लॉक डाऊन राहील अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली. मोदींनी आपल्या भाषणात प्रत्येक नागरिकाने इतरांशी संपर्क टाळावा व विलगीकरणाची काळजी घ्यावी आणि कोरोनाचा संसर्ग टाळावा असे आवाहन केले. आपल्या भाषणात मोदींनी कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी व आरोग्य व्यवस्थेत सुधार आणण्यासाठी १५ हजार कोटी रु.चे पॅकेज जाहीर केले. पण जीवनावश्यक सेवा जनतेपर्यंत कशा पोहचतील याबाबत माहिती त्यांच्या भाषणात दिसून आली नाही.

मोदींनी काही दिवसांपूर्वी झालेल्या जनता कर्फ्यूचे कौतुक केले. हा कर्फ्यू यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी केला. पण एवढ्या वर आपण न थांबता सोशल डिस्टंसिंग म्हणून अजून २१ दिवस सर्व देशाने लॉक डाऊनमध्ये जाण्याची गरज आहे, प्रत्येकाने आपापल्या घरात थांबणे हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक नागरिकाने, कुटुंबाने स्वतःला विलगीकरणात ठेवले नाही तर त्याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागतील, अनेक कुटुंबे कायमची देशोधडीला लागतील, असे स्पष्ट करत माझे हे आवाहन केवळ पंतप्रधान म्हणून नाही तर आपल्या घरातल्या एका सदस्याचे आहे, प्रत्येकाने घराच्या बाहेर एक लक्ष्मण रेषा आखावी, घरातून बाहेर पडणारे पाऊल हे कोरोनासारखा आजार तुमच्या घरात घेऊन येऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

मोदींनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेची माहितीचा आधार घेत पुढील २१ दिवस देशाच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे हेही स्पष्ट केले. कोरोनाच्या साथीची लागण १ लाख लोकांपर्यंत पोहचण्यात ६८ दिवस लागले पण २ लाख लोकांना कोरोनाची लागण ११ दिवसात झाली तर ३ लाख लोकांना केवळ ४ दिवसात कोरोनाने ग्रासले असे मोदींनी सांगितले. ही महासाथ रोखण्यास अमेरिका, इटली, फ्रान्ससारखे देशही अपयशी ठरले असे सांगत सरकारने दिलेल्या आदेशांचे सर्वांनी पालन करावे, घरातून कोणीही बाहेर पडू नये व ही महासाथ रोखावी असे आवाहन मोदी यांनी केले.

प्रत्येक नागरिकाने दुसर्याचा विचार करावा, जे सध्या आपला जीव धोक्यात घालून एक एक जीव वाचवण्यासाठी दिवस-रात्र रुग्णालयात काम करत आहेत, त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता पाळा. जान हैं, तो जहान है,  धैर्य आणि अनुशासनाची हीच वेळ आहे, देशात लॉक डाऊनची स्थिती असेपर्यंत आपला संकल्प पूर्ण करायचा आहे, असे ते म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: