महाराष्ट्रात करोनाचे ११ रुग्ण, विदेशी नागरिकांना देशात बंदी

महाराष्ट्रात करोनाचे ११ रुग्ण, विदेशी नागरिकांना देशात बंदी

मुंबई : बुधवारी देशात कोरोनाच्या नव्या १३ केसेस आढळल्या. त्यात केरळमधील आठ व राजस्थान-दिल्लीतील प्रत्येकी एक केस आहे आणि महाराष्ट्रात पुण्यापाठोपाठ मु

कोरोनासाठी क्लोरोक्विन घेण्याची घाई नको
महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा होणार
अमेरिकेतील अनेक राज्यांत ‘लॉक-डाउन’; स्पेनमध्ये करोनामुळे हाहाकार

मुंबई : बुधवारी देशात कोरोनाच्या नव्या १३ केसेस आढळल्या. त्यात केरळमधील आठ व राजस्थान-दिल्लीतील प्रत्येकी एक केस आहे आणि महाराष्ट्रात पुण्यापाठोपाठ मुंबईतही बुधवारी दोन जणांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. या दोन्ही रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून नागपूरमध्ये अमेरिकेतून आलेल्या एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ११ झाली असून त्यापैकी ८ रुग्ण पुण्यातले आहेत.

नागपुरातल्या ११ संशयित कोरोना रुग्णांपैकी ९ जणांचे अहवाल बुधवारी निगेटिव्ह आले तर एकाला लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

देशात करोनाचे रुग्ण ६७ आहेत.

१५ एप्रिलपर्यंत सर्व विदेशी नागरिकांना भारतात प्रवेशबंदी

करोना विषाणूची साथ जगभर पसरत चालल्याने खबरदारी म्हणून केंद्र सरकारने बुधवारी रात्री जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यटकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून त्यांना १५ एप्रिलपर्यंत भारतातील प्रवेशास बंदी घातली आहे. हा निर्णय १३ मार्चपासून लागू होणार आहे.

 ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांनाच कोरोनाची बाधा, भारतात ६० रुग्ण

ब्रिटनच्या आरोग्यमंत्री नदीन डॉरिस यांनीच स्वत:ला कोरोना विषाणू बाधा झाल्याची माहिती बुधवारी जाहीर केली. माझ्या शरीर तपासणीत कोरोनाचे विषाणू आढळून आले असून यापुढे मी व माझे ऑफिस काही दिवस बंद राहील असे त्या म्हणाल्या आहेत. डॉरिस या ब्रिटनच्या पहिल्याच मंत्री आहेत, ज्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचे ६ बळी गेले असून २६ हजारांच्यावर चाचण्या झाल्या आहेत व त्यापैकी ३७३ लागण झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

इटालीमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. चीननंतर सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण इटालीमध्ये आढळले असून आजपर्यंत तेथे ६३१ जणांचा मृत्यू व १०,१४९ जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या संसर्ग पसरण्याची भीती लक्षात घेता सरकारने संपूर्ण देशात सार्वजनिक ठिकाणी जमण्यास, प्रवासास बंदी व बाहेरून येणाऱ्या विमानांना प्रवेश नाकारला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0