लसीकरणात ६० टक्क्यांची घसरण

लसीकरणात ६० टक्क्यांची घसरण

नवी दिल्लीः २१ जूननंतर देशभरात लसीकरणाचा आठवड्याचा वेग मंदावत ६० टक्क्यांपर्यंत घसरला आहे. लसीकरण मंदगतीने सुरू असल्याने अनेक राज्यांमध्ये लसीची तीव्र टंचाई भासत आहेत.

द हिंदू ने दिलेल्या वृत्तानुसार २१ जूनपर्यंत ९१ लाख लसीचे खुराक देण्यात आले होते. हा आकडा २७ जूनला ४ कोटी खुराकांपर्यंत पोहोचला होता.

५ जुलै ते ११ जुलैपर्यंत केवळ २.३ कोटी खुराकाचे वितरण झाले होते. गेल्या जानेवारी महिन्यापासून लसीकरण सुरू झाल्यानंतर आजपर्यंत ३८ कोटी लसी देण्यात आल्या आहेत.

२१ जूनपासून दररोज ६० लाख लस देण्याचा नियम करण्यात आला होता. पण हा आकडा भारताने ३ जुलैला पार केला होता.

या वर्षाखेर भारतातील सर्व वयोवृद्धांना लस देणे हा सरकारचा प्रयत्न यशस्वी ठरायचा असेल तर दररोज ८० लाख लसी देणे गरजेचे आहे. तरच हे उद्दिष्ट प्राप्त होईल.

लसींची कमतरता असल्याने अनेक राज्यांतील लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत.

राज्यांच्या मागण्या

तामिळनाडू राज्याकडे सध्या ३,९६,७५० खुराक असून त्यांना अजून ११ कोटी ५० लाख खुराकांची गरज आहे. पण या राज्याला १ कोटी ६७ लाख खुराक आजपर्यंत मिळालेले आहेत. राज्य सरकारला संपूर्ण तामिळनाडूचे लसीकरण करण्यासाठी १० कोटी खुराकांची गरज आहे. मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री स्टालिन यांनी पंतप्रधान मोदींना लसीची टंचाई जाणवत असल्याचे सांगितले. त्यांनी एक कोटी खुराकांची मागणीही केंद्राकडे केली आहे.

महाराष्ट्राने आजपर्यंत ३ कोटी ७० लाख खुराक दिले असून दररोज १५ लाख खुराक देण्याची आमची क्षमता असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्राला ७० लाख खुराक मिळाले व या सर्व लसी तीन दिवसांत संपल्या. राज्याने केंद्राकडे प्रति महिना ३ कोटी खुराकांची मागणी केली आहे.

मुंबईमध्ये १८ वर्षांहून अधिक वयोगटातल्या ४७ टक्के लोकसंख्येला पहिला खुराक मिळाला असून २५ टक्के लोकसंख्येला दोन्ही खुराक मिळालेले आहे. शहरातल्या सुमारे ६० लाख नागरिकांना एक वा दोन खुराक मिळालेले आहेत.

बृहन्मुंबई महापालिकेने रोज १ लाख खुराक आम्ही देऊ शकतो असे सरकारला सांगितले आहे. पण लस टंचाईमुळे त्यांना त्यांच्या कोट्याच्या ५० टक्के कोटा पुरा करता आलेला नाही.

कर्नाटकात पहिला खुराक व दुसरा खुराक यामध्ये मोठे अंतर पडले आहे. राज्यातल्या २३ टक्के नागरिकांना दोन्ही लसी मिळाल्या आहेत.

तेलंगणमध्ये अनेक लसीकरण केंद्र खुराकाअभावी बंद पडले आहेत. राज्यातल्या हैदराबाद, रंगारेड्डी, मेडचल मलकगिरी जिल्ह्यात कोवॅक्सिनचे खुराक उपलब्ध नाहीत.

केरळमध्ये १८ वर्षांवरील ४४ टक्के नागरिकांना पहिला खुराक मिळाला असून १६ टक्के नागरिकांना दोन्ही खुराक मिळाले आहेत.

राज्याकडे जुलै महिन्याचे ६० लाख खुराक शिल्लक आहेत. त्यातील २५ लाख खुराक हे दुसरी लस म्हणून दिले जाणार आहेत.

दिल्लीत कोवॅक्सिन लसीची तीव्र टंचाई असून तेथे केवळ दोन दिवसांचा साठा आहे. मंगळवारी लसीअभावी अनेक केंद्र बंद होते. दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी ५०० केंद्रे बंद होती, असे सांगितले आहे.

आंध्र प्रदेश सरकारने दुसरी लस देणार्यांकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. या राज्यालाही लसीची टंचाई जाणवत आहे.

ओदिशाच्या ३० पैकी २४ जिल्ह्यांमध्ये लस उपलब्ध नसल्याचे ट्विट माजी अर्थमंत्री व काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी केले आहे.

ओदिशामध्ये भाजप युती सरकारमध्ये सामील आहे.

मंगळवारी केंद्राने देशातल्या ३८ कोटी ५० लाख नागरिकांना कोविडची लस दिल्याचा दावा केला. यातील ४.७ टक्के लस या केवळ कोवॅक्सिनच्या आहेत.

राहुल गांधी यांची टीका

देशात सर्वत्र जाणवत असलेली लस टंचाई पाहून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर बुधवारी निशाणा साधला. सरकार नागरिकांची दिशाभूल करत असून प्रत्यक्ष लसीकरण वेगाने होत नसल्याचा त्यांनी आरोप केला.

मूळ बातमी

COMMENTS