लॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार

लॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार

नवी दिल्लीः कोरोना महासाथ व लॉकडाऊनमुळे देशातल्या पर्यटन व्यवसायाला मोठा तडाखा बसला असून एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या दरम्यान या व्यवसायाशी निगडीत स

विशाखापट्टणममध्ये विषारी वायूने ११ जणांचा मृत्यू
भारतात बनावट ‘एन-95’ मास्कचा सुळसुळाट
चीनकडून १० भारतीय सैनिकांची सुटका

नवी दिल्लीः कोरोना महासाथ व लॉकडाऊनमुळे देशातल्या पर्यटन व्यवसायाला मोठा तडाखा बसला असून एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या दरम्यान या व्यवसायाशी निगडीत सुमारे २ कोटी १५ लाख जणांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. ही माहिती मंगळवारी राज्यसभेत सरकारने दिली.

माकचे खासदार इलमाराम करीम यांच्या अतारांकित प्रश्नाला केंद्रीय पर्यटन मंत्री जी. कृष्णन रेड्डी यांनी उत्तर दिले. त्यावेळी ते म्हणाले पर्यटन मंत्रालयाने, ‘इंडिया अँड द कोरोनाव्हायरस पॅडेमिकः इकॉनॉमिक लॉसेस फॉर हाउसहोल्ड एंग्जेड् इन टुरिझम अँड पॉलिसीज फॉर रिकव्हरी’ या शीर्षकाखाली एक विस्तृत अभ्यास अहवाल तयार केला असून यांमध्ये पर्यटन क्षेत्राला कोरोना महासाथ व लॉकडाऊन याची बसलेली झळ व त्यातन निर्माण झालेली बेकारी यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

कोरोनाची महासाथ येण्याआधी २०१९ ते २०२० या काळात पर्यटन क्षेत्रात ३ कोटी ८० लाख रोजगार होते. पण कोरोना महासाथ जाहीर झाल्यानंतर एप्रिल ते जून २०२० या पहिल्या लॉकडाऊनच्या काळात पर्यटन उद्योगातील १ कोटी ४५ लाख जण बेरोजगार झाले व नंतर जुलै ते सप्टेंबर २०२० या काळात ५० लाख २० हजार बेरोजगार झाले. त्यापुढे ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या काळात १० लाख ८० हजार बेरोजगार झाले.

कोरोनाच्या या एकूण महासाथीच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेतील प्रत्येक घटकाला झळ बसली. त्यात पर्यटन व्यवसायातील सकल मूल्य वर्धित उलाढाल पहिल्या तिमाहीत ४२.८ टक्के, नंतरच्या तिमाहीत १५.५ टक्के व तिसर्या तिमाहीत १.१ टक्क्याने घसरली. २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल मूल्य वर्धितामध्ये ९३.३ टक्के इतकी घसरण झाली. नंतर ही घसरण दुसर्या तिमाहीत ७९.५ टक्के व तिसर्या तिमाहीत ६४.३ टक्के इतकी असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.

पर्यटन मंत्रालयाने पर्यटनातून किती महसूल मिळाला आहे, याची आकडेवारी ठेवलेली नाही तसेच पर्यटकांच्या प्रवासाचीही मंत्रालयाने माहिती ठेवलेली नाही, असेही रेड्डी यांनी सांगितले.

कोरोना महासाथीच्या काळात देशात परदेशी पर्यटकांची संख्याही वेगाने कमी झाली असून २०१९मध्ये १ कोटी ९३ लाख परदेशी पर्यटक भारतात आले होते. हा आकडा २०२०मध्ये घसरून २० लाख ७४ हजारावर गेला व त्यानंतर या वर्षाच्या जूनपर्यंत तो ४२ हजारांपर्यंत घसरल्याचे रेड्डी यांनी सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: