बनावट टुलकिटः नड्डा, इराणींविरोधात काँग्रेसची तक्रार

बनावट टुलकिटः नड्डा, इराणींविरोधात काँग्रेसची तक्रार

नवी दिल्लीः कोरोना महासाथ संदर्भात देशात संभ्रम पसरवणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न ‘कोविड-१९ टुलकिट’च्या माध्यमातून क

उ. प्रदेशात काँग्रेस ४० टक्के तिकिटे महिलांना देणार
भाजपवर निवडणूक आयोग मेहेरबान
एनआरसीवरून सर्व पक्ष असमाधानी

नवी दिल्लीः कोरोना महासाथ संदर्भात देशात संभ्रम पसरवणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न ‘कोविड-१९ टुलकिट’च्या माध्यमातून काँग्रेस करत असल्याचा आरोप मंगळवारी भाजपने केला. त्यानंतर काँग्रेस व भाजपविरोधात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. पण हे टुलकिट भाजपनेच तयार केल्याचा आरोप करत काँग्रेसने बुधवारी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, बी. एल. संतोष, संबित पात्रा व अन्य नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

पोलिसांनी भाजपच्या या नेत्यांविरोधात फिर्याद दाखल न केल्यास न्यायालयात दाद मागू असे काँग्रेसचे नेते व वकील अमन पवार यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे नेते राजीव गौडा व पक्षाच्या सोशल मीडियाचे प्रमुख रोहन गुप्ता यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात अफवा पसरवणे व बनावटगिरी करत असल्याचा आरोप केला. सरकारने या नेत्यांचे सोशल मीडिया अकाउंट बंद करावे अशीही मागणी या तक्रारीत काँग्रेसने केली आहे.

या प्रकरणासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी भाजपने स्वतः हे बनावट टूलकिट तयार केले असून आपल्या नेत्याच्या खोट्या कथा पसरवून तयार केलेली प्रतिमा वाचवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आता भारताततल्या प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खराखुरा चेहरा समजून चुकला आहे, असा आरोप केला.

ते पुढे म्हणाले, या सरकारला कोणी प्रश्न विचारला तर त्या व्यक्तीचे चारित्र्यहनन करण्याचे प्रयत्न सत्तारुढ पक्षाकडून केले जातात. त्यांच्या अशा हातखंड्यावर लोक आता घाबरत नाही. आम्ही जनतेचा आवाज उठवत जाऊ व सरकारला कठीण प्रश्न विचारत जाऊ.

संबित पात्रांचा आरोप

या कथित टुलकिट संदर्भात भाजपचे प्रवक्ते व नेते संबित पात्रा म्हणाले की, कोरोनाच्या महासाथीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीका करण्याची व त्यांची बदनामी करण्याची संधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोडली नाही. कोरोनाचा आढळलेला नवा प्रकार हा मोदी विषाणू असल्याचा प्रचार काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून सुरू आहे. त्यात काँग्रेस परदेशी पत्रकारांना हाताशी धरून भारताची बदनामीही करत आहेत. राहुल गांधी सकाळी उठून रोज ट्विट करतात, या ट्विटमधील माहिती या टुलकिटमधील असल्याचाही आरोप पात्रा यांनी केला.

काँग्रेसचे अनेक नेते मोदींना पत्र लिहितात. कधी अध्यक्षा सोनिया गांधी तर कधी अन्य कोणी. हे सगळे ठरवून केले जात आहे आणि हे टुलकिटद्वारे होत असल्याचा आरोपही पात्रा यांनी केला.

हे टुलकिट काँग्रेसच्या नेत्या सौम्या वर्मा यांनी तयार केले असून त्या राजीव गौडा यांच्या कार्यालयात काम करत असल्याचा आरोप पात्रा यांनी केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: