देशात ४८ तासांत १ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण

देशात ४८ तासांत १ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण

नवी दिल्लीः देशात बुधवार व गुरुवार या दोन दिवसांत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाहून अधिक दिसून आली. एकट्या महाराष्ट्रात गुरुवारी संध्य

लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याचे संकेत
महानगरांत महिलांचे लसीकरण कमी
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १० ने वाढ

नवी दिल्लीः देशात बुधवार व गुरुवार या दोन दिवसांत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाहून अधिक दिसून आली. एकट्या महाराष्ट्रात गुरुवारी संध्याकाळी कोरोनाचे ३५ हजार ९५२ रुग्ण आढळले. त्यातील मुंबईतच ५ हजार ५०५ नवीन रुग्णांची भर पडली आहे. पुणे मनपात ३ हजार ३४०, नागपूर मनपात २ हजार ६५६ रुग्ण तर नाशिक मनपा हद्दीत २ हजार ३०४ नवे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात कोराना रुग्णांची संख्या ३ लाखांच्या जवळ गेली आहे. तर २४ तासात १११ रुग्ण दगावले आहे.

देशात आजपर्यंत कोरोना लागण झालेल्या रुग्णांची संख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ इतकी नोंदली गेली आहे. गेल्या २४ तासात ५३,४७६ रुग्णांची नोंद झाली. गेल्या १५ दिवसांतील कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असून १५३ दिवसांनंतर ही संख्या सर्वाधिक असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार आजपर्यंत कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या १ लाख ६० हजार ६९२ इतकी झाली असून २४ तासात २५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतचा आहे. तर कोरोनातून ठणठणीत बरे होणार्यांची संख्या १ कोटी १२ लाख ३१ हजार ६५० इतकी आहे. मृत्यूचा दर हा १.३६ टक्के इतका खाली आला आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासात कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या २५१ इतकी झाली असून महाराष्ट्रात ९५, पंजाबमध्ये ३९, छत्तीसगडमध्ये २९, तामिळनाडू व कर्नाटकात प्रत्येकी १२ व केरळात १० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण बळी ५३,६८४ हे देशातील सर्वाधिक असून त्या खालोखाल तामिळनाडूत १२,६३०, कर्नाटकात १२,४६१, दिल्लीत १०,९७३, प. बंगालमध्ये १०,३१२, उ. प्रदेशात ८,७६९ व आंध्र प्रदेशात ७,१९७ इतके कोरोनाचे बळी गेलेले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने देशात कोरोना विषाणूचा दुसरा प्रकार वेगाने पसरत असल्याचे म्हटले आहे. हा विषाणू महाराष्ट्र, दिल्ली व अन्य भागात पसरत असून ब्रिटन, द. आफ्रिका व ब्राझीलमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणू प्रकारापासून हा भिन्न आहे. या तीन देशातील कोरोनाचे विषाणू देशातील १८ राज्ये व काही केंद्रशासित प्रदेशात आढळून आलेले आहेत. पण हेच विषाणूचे प्रकार कोरोनाचा संसर्ग वाढण्यामागे कारणीभूत आहेत, याबद्दल अद्याप स्पष्टता नसल्याचेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. एक कोरोना विषाणू प्रकार B.1.351 हा असून अन्य कोरोना विषाणूचा प्रकार P.1 असा नोंदला गेला आहे. या दोन कोरोना विषाणूंचे ३४ सॅम्पल तपासणीसाठी आले आहेत.

कोरोनाची साथ पुन्हा पसरण्यामागे एक महत्त्वाचे कारण असे की, नागरिकांकडून कोरोनाचा मुकाबला करण्याविषयीच्या प्रतिबंधक उपायांची योग्यप्रकारे अंमलबजावणी होताना दिसत नाही. दुसरे कारण कोरोना विषाणूत बदल होत असल्याने त्यांचा संसर्ग वेगाने होताना दिसत आहे. सध्या सार्स कोवि-२ या कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होताना दिसत आहे. हा विषाणू प्रकार ६ ते ८ महिन्यापूर्वी आढळला होता व तो अनेक राज्यात दिसून आला होता. देशातील सुमारे ७० हून अधिक जिल्ह्यात तो पसरला असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.

कोरोनाची दुसरी लाट

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार फेब्रुवारीपासून देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे म्हटले आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे. ही दुसरी लाट १५ फेब्रुवारीपासून पुढे १०० दिवस देशभर राहू शकते. या दुसर्या लाटेत नवे २५ लाख कोरोना रुग्ण येऊ शकतात व कोरोनाची लाट रोखण्यासाठी प्रतिबंधक उपायांबरोबरच लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालात बिझनेस अक्टिव्हिटी इंडेक्स खालावत चालल्याचेही नमूद करण्यात आले आहे. काही राज्यांनी लॉकडाऊन व अन्य प्रतिबंधक उपायांची घोषणा केल्याने त्याचा परिणाम अनेक व्यवसायांवर झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

कोरोनाची लाट रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्याची गरज असून सध्या दररोज ३४ लाख लसी दिल्या जातात ती संख्या ४० ते ४५ लाख इतकी वाढवली पाहिजे असे या अहवालात म्हटले आहे. ४५ वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी ४ महिने एवढा कालावधी लागणार आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0