कोविड महासाथीत ४२ लाख ५६ हजार मृत्यू

कोविड महासाथीत ४२ लाख ५६ हजार मृत्यू

नवी दिल्लीः जगभरात कोविड रुग्णांची संख्या २० कोटींच्या पुढे गेली असून या महासाथीत एकूण ४२ लाख ५६ हजार रुग्ण दगावले आहेत. कोरोना महासाथीचा सर्वाधिक फटक

किंग कोरोना वि. अमेरिकन स्पिरीट
म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार
राज्यात ब्रिटनमधून आलेल्या नव्या कोरोनाचे ८ रुग्ण

नवी दिल्लीः जगभरात कोविड रुग्णांची संख्या २० कोटींच्या पुढे गेली असून या महासाथीत एकूण ४२ लाख ५६ हजार रुग्ण दगावले आहेत. कोरोना महासाथीचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. तेथे आजपर्यंत ३ कोटी ५३ लाख ३० हजार ८७३ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर या महासाथीत मरण पावलेल्यांची संख्या ६ लाख १४ हजार ७८५ इतकी झाली आहे.

कोविड संक्रमणाचा दुसरा फटका बसलेला देश भारत असून ब्राझीलचा तिसरा आहे.

भारतात कोविड रुग्णांचा एकूण आकडा ३ कोटी १८ लाख १२ हजार ११४ इतका झाला असून ४ लाख ११ हजार ७६ रुग्ण मरण पावले आहेत.

ब्राझीलमध्ये आजपर्यंत कोविडचे २ कोटी २६ हजार ५३३ रुग्ण आढळले असून ५ लाख ५९ हजार ६०७ जणांचा या महासाथीत मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी ही माहिती जाहीर केली. गेल्या २४ तासात कोविडचे ४२,९८२ नवे रुग्ण आढळले तर ७२३ जण मरण पावले. देशात कोविड संक्रमणाची टक्केवारी १.२९ टक्के झाली आहे तर या आजारातून बरे होण्याची टक्केवारी ९३.३७ इतकी झाली आहे.

देशभरात ४८ कोटी ९३ लाख जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यास आली आहे.

जगभरात अजूनही कोरोनाचे थैमान सुरूच

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमा जगभरात सर्वच देशांनी युद्धपातळीवर हाती घेतल्या आहेत. तरीही कोरोनाचे संक्रमण थांबलेले नाही.

रशियामध्ये आता पर्यंत कोरोनाचे ६ कोटी २७ लाख ४ हजार ६ रुग्ण सापडले असून मृत्यूचा आकडा १ लाख ५९ हजार ३२ इतका आहे. फ्रान्समध्ये कोरोनाचे आजपर्यंतचे एकूण रुग्ण ६२ लाख ७२ हजार ८९ असून मृतांचा आकडा १ लाख १२ हजार २३३ इतका आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना संक्रमणाचे एकूण रुग्ण ५९ लाख ८० हजार ८८७ इतके असून १ लाख ३० हजार ३०० व्यक्तींना या महासाथीत प्राण गमवावे लागले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: