राज्यात हिल स्टेशन, पर्यटन ठिकाणांवर निर्बंध

राज्यात हिल स्टेशन, पर्यटन ठिकाणांवर निर्बंध

कोविड-१९च्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतेकतर हिल स्टेशनवर नव्या नियमावलीनुसार अनेक बंधने आणण्यात आली आहेत. त्याच बरोबर राज्यातील अभय

कुळकथा चैत्यभूमीची…
विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांना बंदी
कुलगुरुंनी राजीनामा द्यावा – आयेशी घोष

कोविड-१९च्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतेकतर हिल स्टेशनवर नव्या नियमावलीनुसार अनेक बंधने आणण्यात आली आहेत. त्याच बरोबर राज्यातील अभयारण्येही पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. विशेषतः मुंबई नजीकची सर्व हिल स्टेशन, पर्यटन स्थळे व जंगले पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत.

मुंबई नजीक असलेले लोकप्रिय हिल स्टेशन माथेरानवरील शार्लोट लेक, अलेक्झांडर पॉइंट, रामबाग पॉइंट, बिग चौक पॉइंट, वन ट्री हिल पॉइंट, इको पॉइंट, लुईसा पॉइंट, कोरोनेशन पॉइंट, सनसेट पॉइंट व मंकी पॉइंट पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. पण अमन लॉज ते माथेरान धावणारी मिनी ट्रेन मात्र चालू आहेत.

माथेरानवरील पर्यटकांसाठीचे महत्त्वाची ठिकाणे बंद केल्यामुळे अनेक दुकानदार, हॉटेल व्यवसायिक नाराज झाले आहेत. नगर परिषदेने अशी पावले उचलायला नको होती, असे दुकानदार व अन्य व्यावसायिकांचे म्हणणे आहे. पण माथेरानबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. माथेरानवर दरदिवशी २५०० पर्यटकांचा राबता असायचा तो बुधवारी घसरून ४५० पर्यटकांवर आला आहे.

माथेरानबरोबर पांचगणी व महाबळेश्वर ही अत्यंत लोकप्रिय असलेली हिल स्टेशनवरही काही निर्बंध आणण्यात आले आहेत. पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी शहरांतील चारही महत्त्वाचे पॉइंट पर्यटकांसाठी बंद केल्याचे सांगितले.

तर महाबळेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी यांनी वेण्णा तलावातील जलपर्यटन बंद केल्याचे सांगितले. महाबळेश्वर परिसरातील अन्य पॉइंट वन खात्याने बंद केल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्बंधामुळे रोजचा २००० पर्यटकांचा आकडा २००वर आला आहे.

साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी सांगितले की, राज्य शासनाने कोविड-१९ निर्बंधांची नवी नियमावली जारी केल्याने पर्यटकांसाठी किल्ले, वस्तुसंग्रहालय व अन्य ठिकाणे बंद केली आहेत.

पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील लोणावळा व खंडाळा आणि अन्य पर्यटन ठिकाणे बंद केल्याचे सांगितले.

मुंबई नजीकचे कर्नाळा अभयारण्य व बोरीवली उपनगरातील संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. मुंबई नजीक एलिफंटा लेणी, घारापुरी पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0