नेमक्या समालोचनाचा व निष्पाप मूल्यांचा वारसा

नेमक्या समालोचनाचा व निष्पाप मूल्यांचा वारसा

इंग्लिश समरचा अविभाज्य भाग असलेल्या हवेशीर, थंड सकाळी क्रिकेटचा खेळ जेवढा चुरशीचा होईल, तेवढा सुखद भासतो. चाहत्यांमधून उठणाऱ्या आरोळ्या थोड्या सौम्य अ

‘भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने अशक्य’
न्यूझीलंड संघाचा दिमाखदार विजय…
किमया खेळपट्टीची की फिरकी गोलंदाजांची?

इंग्लिश समरचा अविभाज्य भाग असलेल्या हवेशीर, थंड सकाळी क्रिकेटचा खेळ जेवढा चुरशीचा होईल, तेवढा सुखद भासतो. चाहत्यांमधून उठणाऱ्या आरोळ्या थोड्या सौम्य असतात, टाळ्या मोजूनमापून वाजवल्या जातात आणि मूडही वातावरणाला साजेसा असतो. चकाकता लालचुटुक चेंडू येथे जशा निर्णायक उसळ्या आणि झोके घेतो, तसा जगाच्या पाठीवर अन्यत्र क्वचितच घेत असेल. बॅटिंग सोपे नसते, टिकून राहण्यासाठीच संघर्ष करावा लागतो. प्रत्येक बॉल बॅटची कड घेईल आणि आपल्या हातात येऊन विसावेल अशा अपेक्षेत स्लिपमध्ये फिल्डर्सचे कोंडाळे उभे असते.

सगळे वातावरण बोलरच्या बाजूने झुकलेले असताना ओव्हरपिच्ड आउटस्विंगर चांगला खेळून काढणारा  किंवा खणखणीत ड्राइव्ह्ज ठोकणारा बॅट्समन विरळाच. एक बॉल कसाबसा खेळायचा आणि पुढचा चुकवायचा अशी बॅट्समनची तारांबळ बघण्याची सवय असलेल्या प्रेक्षकांसाठीही हे क्षण वेगळे ठरतात. बॉल इन-फिल्ड पार करून जात आहे असा वास जरी लागला तरी लयीत टाळ्या वाजतात.

हे सगळे टीव्हीवर बघणाऱ्यांसाठी व्हॉइस ओव्हरशिवाय हा अनुभव अपूर्ण असतो. प्रत्येक फटक्याचे वर्णन शक्य तेवढ्या उत्तेजक शब्दांत करणारा व्हॉइस ओव्हर. आपले वर्णन साजेशा शब्दांत व्हावे असे अचूक फटकावल्या गेलेल्या कव्हर ड्राइव्हलाही वाटत असेल. मात्र, समालोचन करताना दुर्मीळ क्षणांचे वर्णन करण्यासाठी वापरले जाणारे अनेक वाक्प्रचार पाल्हाळाच्या हद्दीत शिरतात.

काही वेळा परिस्थिती थोडी वेगळीही असते. मायक्रोफोन हाती धरलेल्या व्यक्तीकडे शॉटचे वर्णन करण्यासाठी केवळ एकच शब्द असतो- रन्स. हा शब्द मायकल होल्डिंग यांच्या जमेकन अक्सेंटमधील खोल खर्जात उच्चारला जातो. एक क्षण शांतता. पुन्हा केवळ तथ्य सांगणारे शब्द ‘फोर ऑफ देम’. हा माणूस कदाचित मुद्दाम तुमच्या उत्साहाला आवर घालत आहे की काय असे क्षणभर वाटून जाते.

अर्थात होल्डिंग यांचा खास खर्जातील आवाज त्यांच्या शब्दांबाबतच्या कंजुषीची भरपाई करत होता.  त्यांचा आवाज खास मायक्रोफोन्ससाठी विकसित केल्यासारखा होता. त्यांचे समालोचन कक्षात असणे म्हणजे विशिष्ट ओळखीची खूण किंवा खोलवर वाटणारा दिलासा होता. सामन्यात कोण पुढे आहे याची चिंता तुम्हाला वाटू नये, जेम्स अँडरसनने कसा अचूक बॉल टाकला हा विचार मनात येऊ नये, जे चालले आहे ते सगळे महत्त्वाचे वाटावे ते एकाच कारणासाठी आणि ते कारण म्हणजे होल्डिंग तुम्हाला ते सांगत आहेत. हे एवढे साधे होते.

गेली तीन दशके होल्डिंग सातत्याने क्रिकेट प्रसारणात सहभागी होते. एवढा परिचय म्हटला की अवज्ञेची शक्यता वाढते. पण आश्चर्याची बाब म्हणजे होल्डिंग यांच्या समालोचनाची ओळख जेवढी जास्त होत गेली, तेवढी त्यातील दिलाशाची जाणीव सुखद होत गेली. आणि हे साध्य करण्यासाठी त्यांना स्वत:मध्ये फार काही बदल करावे लागले नसतील. त्यांच्या स्थिर नोंदी, विरामाच्या जागा, शांत देहबोली, सहसा रोमांचित न होणारे व्यक्तिमत्व हा एक ब्रॅण्ड तयार झाला होता आणि निवृत्तीपर्यंत तो तसाच होता.

अर्थात होल्डिंग यांचे वैशिष्ट्य निराळेच होते. ते म्हणजे त्यांनी क्रिकेटर म्हणून आख्यायिका ठरलेल्या कर्तृत्वाच्या छायेत,  आपली समालोचकाची भूमिका, कधीच झाकोळू दिली नाही.

बहुतेक क्रिकेटपटूंसाठी समालोचन हा निवृत्तीनंतरचा सुरक्षित व्यवसाय असतो आणि त्यातील कर्तृत्व हे आपण गाजवलेल्या काळातील किस्से रंगवण्यापलीकडे जात नाही. खेळत असताना त्यांनी कमावलेल्या लोकप्रियतेमुळे चर्चेला वजन येते आणि प्रसारणकर्ते ते जे बोलतील त्यावर आनंदाने सहमती दाखवतात. मात्र, तटस्थ मूल्यमापनात असे लक्षात येते की, क्रिकेटपटू म्हणून सामान्य कामगिरी केलेले लोक समालोचनाचे काम खूपच मनापासून करतात. होल्डिंग या निरीक्षणाला दुर्मीळ अपवाद आहेत. ते सार्वकालिक महान क्रिकेटपटूंपैकी एक आहेत यात वाद नाही. वेगवान गोलंदाजाची दहशत काय असू शकते हे त्यांनी एका संपूर्ण पिढीला दाखवून दिले. भारताचे माजी वेगवान गोलंदाज झहीर खान व अजित आगरकर हे २०१७ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत होल्डिंग यांच्या रन-अप आणि क्रीझवरील दबदब्याबद्दल अचंबित होऊन बोलत होते. त्यांच्या गोलंदाजीच्या दिवसांतील काही वैशिष्ट्ये समालोचकाच्या भूमिकेतही झिरपलेली दिसतात. त्याचवेळी होल्डिंग यांना केवळ एक समालोचक म्हणून ओळखणाऱ्या पिढीतही त्यांच्या गोलंदाजीचे चाहते आहेत. टीव्हीवर सातत्याने दिसत राहिल्यामुळे होल्डिंग कधीच कालबाह्य झाले नाहीत. क्रिकेटच्या दिखाऊ व्यावसायिकीकरणाला स्पष्टपणे विरोध केला तरीही नवीन पिढीला ते काळाच्या सीमा ओलांडून आवडत राहिले.

होल्डिंग यांच्याबद्दलच्या आकर्षणाचे एक कारण म्हणजे त्यांनी कधीच प्रस्थापितांची री ओढली नाही. क्रिकेटच्या हिताचे जे नाही त्याला विरोध करण्यास ते फारसे कचरले नाहीत. आयपीएल वगैरे त्यांना फारसे मानवणारे नव्हते. होल्डिंग यांच्या टीकेमध्ये काहीसा जुनाट स्वर लागत असला तरी त्यांनी लोकप्रियतेच्या रेट्याचा परिणाम आपल्या ठाम मतांवर होऊ दिला नाही.

होल्डिंग यांच्यातील या प्रामाणिकपणामुळेच कदाचित क्रीडाक्षेत्रातील वर्णभेदासारख्या नाजूक विषयावर ते मोकळेपणाने व स्पष्ट बोलू शकले. २०२० सालातील इंग्लिश समरच्या सुरुवातीला स्काय स्पोर्ट्सने ही समस्या तपशीलवार मांडली. त्यावेळी होल्डिंग यांनी माजी इंग्लिश क्रिकेटपटू एबोनी रेनफोर्ड-ब्रेण्ट यांच्यासोबत आपल्याला आलेले वर्णभेदाचे अनुभव अत्यंत स्पष्टपणे नमूद केले. ही समस्या शब्दांच्या आवरणाखाली दडवण्यापेक्षा ती सरळ हाताळावी यावर त्यांनी अत्यंत कळकळीने भर दिला. “सगळे जीव महत्त्वाचे आहेत हे आम्हाला ओरडून सांगू नका. गोऱ्यांच्या आयुष्यांना जास्त किंमत दिली गेली आहे हे स्पष्ट आहे. म्हणूनच आता आम्हाला काळ्यांच्या आयुष्यांना महत्त्व मिळायला हवे आहे,” असे होल्डिंग अत्यंत मर्मभेदी स्वरात म्हटल्याचे आपण बघितले.

क्रिकेटचे पितामह म्हणता येईल असे स्थान त्यांनी प्राप्त केले आहे आणि म्हणूनच त्यांनी केलेल्या आवाहनाची उत्कटता खूप अधिक आहे. या वक्तव्यातील सुक्ष्म पदरांचा कीस पाडणे अशक्य आहे, कारण, ते होल्डिंग यांच्या मुखातून आले आहे. एका अतिशय ज्वलंत विषयावरील चर्चेतही ‘काय’ बोलले जात आहे हे जेवढे महत्त्वाचे होते, तेवढेच महत्त्वाचे ‘कोण’ बोलत आहे हेही होते. होल्डिंग यांनी क्रिकेटच्या मैदानावर गाजवलेले असामान्य कर्तृत्वही दोन बोटे खुजे ठरावे एवढी उंची त्यांच्या या वक्तव्याने गाठली होती.

तीन दशके हा तसा दीर्घ काळ. या काळात होल्डिंग यांनी त्यांचे सर्व काही ओतले. क्रिकेट जगाच्या पाठीवर जेथे कोठे खेळले जाते, तेथे तेथे ते पोहोचले होते. अखेरची काही वर्षे ते इंग्लंडच्या स्काय स्पोर्ट्सवर आणि दक्षिण आफ्रिकेच्या सुपरस्पोर्टवरच दिसत होते, तरीही त्यांची लोकप्रियता सर्वत्र कायम आहे. वेगाने मागे पडत चाललेल्या पारंपरिकतेच्या विटक्या अंशांचे प्रतिनिधित्व होल्डिंग यांनी केले.

भारताने इंग्लंड दौऱ्यातील अखेरच्या कसोटी सामन्यातून अंग काढून घेतले, त्याचा सर्वांत लज्जास्पद परिणाम म्हणजे ही कसोटी रद्द झाल्यामुळे होल्डिंग यांना त्यांच्या कारकिर्दीला साजेसा निरोप मिळू शकला नाही. रिची बेनो यांनी ४२ वर्षे काम केल्यानंतर बीबीसी व चॅनल फोरमधून निवृत्ती घेतली त्या क्षणानंतर यूकेच्या क्रिकेट प्रसारण इतिहासातील हा सर्वांत महत्त्वाचा क्षण ठरला असता. २००५ सालातील समरच्या अखेरीस ओव्हलचे खच्च भरलेले स्टॅण्ड्स उभे राहून बेनो यांच्यासाठी टाळ्या वाजवत होते. पाचवा कसोटी सामना झाला असता तर ओल्ड ट्रॅफर्डच्या प्रेक्षकांनी होल्डिंग यांना अगदी असाच निरोप दिला असता. त्यांच्या प्रवासाची ही समर्पक सांगता ठरली असती.

होल्डिंग पुन्हा समालोचन कक्षात दिसणार नाहीत हे त्यांनाही निश्चित माहीत आहे. स्काय पॅनलला त्यांच्याशिवाय पुढे जाणे कठीण जाणार आहे. इंग्लिश समर पूर्वी होता तसा होण्यासाठी बराच काळ जावा लागणार हे नक्की.

होल्डिंग यांची अनुपस्थिती बोचण्याची कारणे अनेक असतील पण त्यातील सर्वांत मोठे कारण म्हणजे राष्ट्रीय मंडळे व क्रिकेटपटूंचे हित जपणाऱ्या व्यावसायिक पीआर कंपन्यांच्या कचाट्यात अडकलेल्या क्रिकेटमधील ते सन्माननीय अपवाद होते. ही बाब लक्षात घेतली, तर कदाचित होल्डिंग यांनी निवृत्तीचे टायमिंग अचूक साधले आहे.

मूळ लेख:

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0