‘भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने अशक्य’

‘भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने अशक्य’

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हा भारत व पाकिस्तानदरम्यानचा महत्त्वाचा व वास्तववादी प्रश्न आहे. हा दहशतवाद दोन्ही देशांचे संबंध सुधारण्याच्या

‘भारतीय गोबेल्सचा विजय’
मुसलमान परके हा लोकप्रिय समज
सगळं बदलेल पण भारत हिंदू राष्ट्रच – सरसंघचालक

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हा भारत व पाकिस्तानदरम्यानचा महत्त्वाचा व वास्तववादी प्रश्न आहे. हा दहशतवाद दोन्ही देशांचे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत या दोन देशांमध्ये चर्चेची शक्यता नाही. अशा वातावरणात भारत-पाकिस्तानदरम्यान क्रिकेटचे सामनेही अशक्य असल्याचे स्पष्ट प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी न्यू यॉर्क येथे केले. पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने होऊ नये अशी देशातील जनतेची भावना आहे असेही ते म्हणाले.

उरी, पठाणकोट, पुलवामा अशा घटनांचा उल्लेख करत जयशंकर यांनी दहशतवाद, आत्मघाती हल्ले, हिंसाचार अशा वास्तवात ‘टी ब्रेक’ म्हणून उभय देशांमध्ये क्रिकेटचे सामने खेळवले गेले तर त्याने लोकभावनेचा अनादर केल्यासारखे होईल. लोकशाहीत लोकभावना महत्त्वाच्या असतात. अशा वेळी रात्री दहशतवाद व दिवसा क्रिकेट असा संदेश मी देऊ इच्छित नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

जयशंकर यांनी पाकपुरस्कृत दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानवर कडक शब्दांत टीका केली. दहशतवाद हा पाकिस्तानच्या सरकारचा एक धोरणात्मक भाग आहे. त्यामुळे या देशाशी चर्चा करता येणे अशक्य आहे, असे त्यांनी सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1