क्रिप्टो करन्सी अर्थव्यवस्थेला धोकाः रिझर्व्ह बँक

क्रिप्टो करन्सी अर्थव्यवस्थेला धोकाः रिझर्व्ह बँक

मुंबईः क्रिप्टो करन्सी (आभासी चलन) हे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरूवारी व्यक्त केले.

मोदी ‘खंदे’ नेते, मग सरकारची कामगिरी वाईट का?
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघातात निधन
सीएए संदर्भातील सर्व याचिकांची सुनावणी ३१ ऑक्टो.पासून

मुंबईः क्रिप्टो करन्सी (आभासी चलन) हे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरूवारी व्यक्त केले. क्रिप्टोकरन्सी अर्थव्यवस्थेला मारक असल्याचे स्पष्ट मत रिझर्व्ह बँकेचे आहे. या चलनाचा धोका देशाच्या वित्त व्यवस्थेपासून अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांच्या स्थिरतेला आहे. रिझर्व्ह बँकेची धोरणे अर्थव्यवस्थेला प्रगतीवर आणण्याचे व स्थिर करण्याचे प्रयत्न करत असते, तिच्या प्रयत्नांना अशा चलनाचा धोका आहे अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचे दास यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, गुंतवणुकदारांनी अशा आभासी चलनामध्ये गुंतवणूक करण्यापासून दूर राहावे. त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर या चलनात गुंतवणूक करण्याबाबत निर्णय घ्यावेत, पण हे चलन म्हणजे तुमची गुंतवणूक नाही, हे समजून घ्यावे. रिझर्व्ह बँक स्वतःचे डिजिटल चलन आणताना काळजी घेत असल्याचे दास यांनी स्पष्ट केले. असे चलन आणताना सायबर सुरक्षेबाबत तडजोड करता येणार नाही. प्रत्येक टप्प्यावर पावले जबाबदारीने व काळजीपूर्वक टाकली पाहिजेत, असे दास यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0