दहा लाख नोकऱ्या जाण्याची भीती

दहा लाख नोकऱ्या जाण्याची भीती

या वर्षी सुरुवातीला गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी आर्थिक वाढीची नोंद झाली. भारताच्या वस्तुनिर्माण उद्योगांमधील निम्मा वाटा असलेल्या वाहन उत्पादन क्षेत्रातील मंदी हे यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे.

प्रसिद्ध गायक टीएम कृष्णा, सिद्धार्थसहित ६०० जणांवर गुन्हे
लॉकडाउनमुळे सूक्ष्म-लघु उद्योग संकटात, सरकारची कबुली
काळ चांगलाच सोकावलाय

भारताच्या वाहन उद्योगातील सुटे भाग निर्मिती उद्योगांमध्ये ५० लाखांच्या आसपास लोक काम करतात. वाहनांच्या विक्रीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दिसून येणारी घट जर अशीच कायम राहिली तर या उद्योगाला त्यातील एक पंचमांश कामगारांना काढून टाकावे लागेल असे वाहनांचे सुटे भाग तयार करणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहाच्या अध्यक्षांनी सांगितले.

भारतातील वाहन उद्योग आजवरच्या त्याच्या सर्वाधिक वाईट परिस्थितीमधून जात आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये पहिल्या तिमाहीमध्ये १८.४% घट झाली तर जूनमध्ये प्रवासी वाहनांच्या मासिक विक्रीमध्ये १८ वर्षातील सर्वाधिक फरकाने घट झाली.

या मंदीमुळे वाहननिर्मिती करणाऱ्या कारखान्यांमध्ये उत्पादन कमी करणे आणि वाहन उद्योगांचे आणि सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या कमी करणे अपरिहार्य झाले आहे.

उत्पादनातील घटीमुळे “वाहनांच्या सुट्या भागांच्या क्षेत्रात संकटासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे,” असे ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (ACMA) चे अध्यक्ष राम वेंकटरामाणी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. “जर प्रचलन असेच चालू राहिले तर अंदाजे १० लाख लोकांना आपली नोकरी गमवावी लागू शकते.”

भारतात या वर्षी सुरुवातीला गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी आर्थिक वाढीची नोंद झाली. भारताच्या वस्तुनिर्माण उद्योगांमधील निम्मा वाटा असलेल्या वाहन उत्पादन क्षेत्रातील मंदी हे यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे.

वेंकटरामाणी म्हणाले सरकारचे विद्युत वाहनांबद्दलचे (EVs) धोरण स्पष्ट नसल्यामुळे वाहन उद्योगातील गुंतवणुकी गोठल्या आहेत. ते म्हणाले भारतीय बाजारपेठेत विद्युत वाहने आणण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढवण्याच्या सरकारी योजनेमुळे भारताचा आयातीवरील खर्च वाढेल आणि वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागेल.

वेंकटरामाणी यांनी वाहनांवरील व वाहनांच्या सुट्या भागांवरील जीएसटी कमी करण्याचीही मागणी केली.

(रॉयटर्स)

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1