तामिळनाडूत दलित युवकाची जमावाकडून हत्या

तामिळनाडूत दलित युवकाची जमावाकडून हत्या

चेन्नई : शहरापासून नजीक विल्लुपूरम येथे शक्तीवेल या २४ वर्षीय दलित तरुणाला तो रस्त्याच्या कडेला शौचास बसल्याच्या कारणावरून जमावाने बेदम मारहाण करून ठा

पलानीस्वामींकडे अण्णाद्रमुकचे नेतृत्व
माणसाच्या आयुष्याचे सरकारला मोल नाही – उच्च न्यायालय संतप्त
चेन्नईमधील पाणीसंकट व मान्सूनचे उशीरा आगमन

चेन्नई : शहरापासून नजीक विल्लुपूरम येथे शक्तीवेल या २४ वर्षीय दलित तरुणाला तो रस्त्याच्या कडेला शौचास बसल्याच्या कारणावरून जमावाने बेदम मारहाण करून ठार मारले. पण या मारहाणीला जातीचे कारणही सांगितले जात आहे. शक्तीवेलची बहीण थिवन्नीने आपल्या भावाला तो दलित असल्याने ठार मारल्याचे पोलिसांना सांगितले. ही घटना गेल्या आठवड्यात बुधवारी घडली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर आल्याने पोलिसांनी शुक्रवारी सात जणांना अटक केली व या प्रकरणात अन्य काही जणांना अटक केली जाणार असल्याचे चेन्नई पोलिसांनी सांगितले.

विल्लुपूरम या गावात वनियार्स या ओबीसी जातीचे वर्चस्व आहे. उ. तामिळनाडूमध्ये ही जात शक्तीशाली ओबीसी जात समजली जाते आणि या जातीचा दलितांशी संघर्ष अनेक काळ सुरू आहे.

शक्तीवेल हा विल्लुपूरम येथे एका पेट्रोल पंपवर काम करत होता. रात्रीचे काम आटपून तो बुधवारी सकाळी घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याला त्याच्या एका मित्राने कामासाठी फोन करून सोबत आधार कार्ड व फोटो आणण्यास सांगितले.

शक्तीवेल बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घरातून बाहेर पडला पण त्याच्या मोटार सायकलमध्ये पेट्रोल कमी असल्याने तो गाडी ढकलत चालत गेला. त्याने त्याच्या एका मित्राला पेट्रोलसाठी रिकामी बाटली आणण्यास सांगितले. या दरम्यान शक्तीवेलच्या पोटात दुखू लागल्याने तो कळवळून शौचासाठी रस्त्याच्या कडेला बसला.

यानंतर काही वेळेनंतर शक्तीवेलच्या मोबाइल फोनवरून त्याच्या बहिणीला थिवन्नीला एक फोन आला. या फोनमधून एका व्यक्तीने शक्तीवेलला आम्ही बांधले असून तो आमच्या ताब्यात आहे, त्याला न्यायचे असल्यास बुथूर हिल्स येथे यावे, असे त्याने थिवन्नीला सांगितले.

थिवन्नीने आपले सहा महिन्याचे मुल व एका नातेवाईकासोबत बुथूर हिल्स गाठले. तेथे तिला शक्तीवेल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या नाकातून, तोंडातून रक्त वाहत होते. सुमारे १५ ते २० जणांच्या तरुणांच्या टोळक्याने शक्तीवेलला घेरले होते. थिवन्नीला पाहताच या टोळक्याने शक्तीवेलला पुन्हा मारहाण करण्यास सुरूवात केली. थिवन्नीने टोळक्याला मारहाण करण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले पण तिलाही लाथा मारण्यात आल्या. यात ती व तिचे बाळही जमिनीवर पडले पण उपस्थित असलेल्या एकाही व्यक्तीने शक्तीवेल व त्याच्या बहिणीला, बाळाला उचलण्याचा प्रयत्न केला नाही.

अखेर दोन तासांनी पोलिस घटनास्थळी पोहचले. रक्तबंबाळ अवस्थेत शक्तीवेलला एका मोटार सायकलवरून घरी नेण्याचा प्रयत्न केला गेला. पण घरानजीक असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे थिवन्नीने सांगितले. डॉक्टरांनी त्याचा इस्पितळात पोहचण्याआधीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. विल्लुपूरमचे पोलिस अधिक्षक डी. जयकुमार यांनी शक्तीवेलला जबर मारहाण झाल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तो मृत्यू पावला असे सांगितले.

या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सात जणांना अटक केली. त्यामध्ये तीन महिला व चार पुरुष आहेत.

अटक केलेल्यांनी शक्तीवेल गुप्तांग दाखवत असल्याचा आरोप केला आहे. हे आरोप थिवन्नी यांनी फेटाळत तो दलित असल्यामुळे त्याला ठार मारण्यात आले असा आरोप केला. शक्तीवेलच्या कमाईवर आमचे घर चालत होते. त्याने दहावीनंतर शिक्षण सोडले व रोजगार करून त्याने आपल्या दोन्ही बहिणींची लग्ने केली, असे थिवन्नी यांनी पोलिसांना सांगितले. पेट्रोल पंपवर काम करण्याअगोदर शक्तीवेल सिमेंटच्या गोण्या उचलण्याचे काम करत होता अशी माहिती थिवन्नीने दिली.

शक्तीवेलकडील आधार कार्ड जमावाला सापडले या कार्डमध्ये त्याच्या जातीचा उल्लेख असल्याने त्याला जातीवाचक शिव्या देत मारहाण करण्यात आली.

या प्रकरणी आरोपीवर अनु.जाती/अनु. जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा व कलम ३०२ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: