जामियातील पोलिस तोडफोडीचे बिल २ कोटी ६६ लाख

जामियातील पोलिस तोडफोडीचे बिल २ कोटी ६६ लाख

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी जामिया विद्यापीठात घुसून जी कारवाई केली व विद्यापीठाच्या मालमत्तेचे नुकसान केले त्याची भरपाई म्हणून विद्यापीठाने २ कोटी

‘शक्ती सुधारणा विधेयक’ विधानसभेत मंजूर
मध्य प्रदेशात ‘लव्ह जिहाद’ विधेयक
विमा क्षेत्रात ७४ टक्के परकीय गुंतवणुकीचे बिल संमत

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी जामिया विद्यापीठात घुसून जी कारवाई केली व विद्यापीठाच्या मालमत्तेचे नुकसान केले त्याची भरपाई म्हणून विद्यापीठाने २ कोटी ६६ लाख रु.चे बिल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठवले आहे. या बिलामध्ये फुटलेल्या २५ सीसीटीव्हींची रक्कम ४ लाख ७५ हजारू रु. लावली आहे. हे सीसीटीव्ही दिल्ली पोलिसांनी फोडल्याचा संशय घेतला जात आहे.

गेल्या वर्षी १५ डिसेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी जामियामध्ये घुसून विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली होती व विद्यापीठाच्या ग्रंथालयात व अन्य कार्यालयात घुसून मालमत्तेची नासधूस केली होती. जामिया प्रशासनाने नुकसान झालेल्या मालमत्तेची सविस्तर यादी मनुष्यबळ विकास खात्याला पाठवली असून त्यात ४१ लाख २५ हजार रु.चे दरवाजे, २२ लाख ५ हजार रु. किमतीच्या खिडक्यांच्या काचा, १८ लाख रु.चे रेलिंग, १५ लाख रु.चे हार्डवेअर, १४ लाख रु.चे ग्रंथालयातील टेबल यांचा समावेश आहे. त्याचबरोबर ७ लाख रु.च्या १७५ खूर्च्या, ६ लाख रु. शौचालयाची नासधूस, ७.५ लाख रु. झाडांचे नुकसान, ८ लाख रु.च्या फरशा, ४.५ लाख रु.चे अल्युमिनियमचे दरवाजे, २२.५ लाख रु. भिंतीवरच्या रंगाचे नुकसान असा खर्च लावण्यात आला आहे.

नुकसानीच्या या यादीत १२ लाख ४० हजार रु.चे विजेचे दिवे, ३.८ लाख रु. स्टोन किपिंग, साडेपाच लाख रु.चे फॉल सिलिंग, अडीच लाख रु.चे कर्ब स्टोन, ७२,६३० रु.चे ७५ आरसे, ७२ हजार रु.चे १८० किमती ग्लास फिल्म यांचाही समावेश आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0